Home वाशिम सापळी-सोंडा रस्त्याचे तीन तेरा बस सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बससेवा सुरू...

सापळी-सोंडा रस्त्याचे तीन तेरा बस सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बससेवा सुरू करण्याची पालकांची आर्त हाक-

176
0

आशाताई बच्छाव

1000619681.jpg

सापळी-सोंडा रस्त्याचे तीन तेरा बस सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बससेवा सुरू करण्याची पालकांची आर्त हाक- अनसिंग :-(ता.६ ) वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)तालुक्यातील सापळी ते सोंडा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे रस्त्याचे तीन तेरा वाजल्यामुळे मागील पाच सात दिवसांपासून अनसिंग –सापळी – सोंडा ही बससेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे सापळी – सोंडा येथील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बरोबरच अनसिंग बाजार पेठेशी ये-जा करण्यास व्यत्यय येत असल्याने स्थानिक सर्वसामान्य नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे खाजगी वाहनाने प्रवास करत असताना त्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की,अनसिंग – सापळी – सोंडा ह्याबसची सकाळी नऊ व सायंकाळी साडेचार वाजता अशा दोन फेऱ्या आहेत ह्या बसने शेकडो विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थ ये-जा करतात ह्या ग्रामस्थांना अनसिंग बाजार पेठ असल्याने तथा जिल्ह्याचे कामकाजा निमित्ताने ह्या बसने प्रवास लागतो यावर्षी पावसामुळे बसचे मार्गात ठिक ठिकाणी खड्डेच खड्डे व भगदाड पडल्यामुळे रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे ह्या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही बससेवा मागील पाच सात दिवसांपासून बंद करण्यात आली.ह्याबसने प्रवास करणारे पासधारक शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनी जवळपास शंभरवर आहेत पण ही बससेवा बंद झाल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे तसेच स्थानिक नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे यामुळे त्यांना आर्थिक झळ बसत असून वेळेचा अपव्यय होत आहे खाजगी वाहन कधी येईल व कधी निघेल याचा नेम नसल्याने त्यांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे तरी संबंधित विभागाने त्वरीत उपाययोजना करून ही बससेवा पुर्ववत सुरू करून देण्यात यावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी आर्त हाक देत पालकवर्गासह स्थानिक नागरिकांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.अनसिंग -सापळी -सोंडा चालणारी एकच बस सकाळी व सायंकाळी अशा दोन फेऱ्या मारते तीने शालेय विद्यार्थ्यांसह ग्राम सोंडा व ग्राम सापळीचे ग्रामस्थ अनसिंग बाजार पेठ तसेच जिल्ह्याचे कामांकरिता ह्या बसने प्रवास करतात पण पावसाचे पाण्यामुळे रहेमतभाई याचे शेतासमोरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे मोटरसायकल,ॲटोरिक्षा किंवा सायकल शिवाय येताना किंवा जाताना मोठे वाहन जात नाही अथवा नेता येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह अनसिंग ला जायचे असल्यास खाजगी वाहन अथवा पायदळी पाच ते सात किलोमीटर चालत जावे लागते.सा.बां.विभाग केलेल्या तक्रारीची दखल घेत नाही एवढी बिकट अवस्था आहे तक्रार कोणाकडे करावी हाच येथे प्रश्न आहे.
श्री.रतन उर्फ पिंटू ढगे
सापळी ग्रामपंचायत, सरपंच

Previous article९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा
Next articleपरळीत अवजड वाहनांची वाहतूक जिरेवाडी बायपास मार्गे करावी; अन्यथा तीव्र आंदोलन- अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here