आशाताई बच्छाव
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी): मानवी अस्तित्व कशासाठी आहे याचा शोध घेण्यासाठी फा.फ्रान्सिस दिब्रिटो अनेक देशांमध्ये गेले,खूप प्रवास केला,भारतभर फिरले अनेकांना भेटले आणि त्यातून ओयाशिसच्या शोधात नावाचा प्रबंध तयार झाला, वसई मधील गुंडगीरी विरोधात आवाज उठवला, निसर्ग आपला सोबती आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी “हरित वसई” चळवळ सुरू केली,ज्ञानोदय मासिकाच्या माध्यमातून विषमतेचा हुंकार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले,अतिशय स्वच्छ व चांगले जीवन जगले,”मी नाही एकला” हे त्यांचे आत्मचरित्र व अतिशय सोप्या भाषेतील सुबोध बायबल विचारांची उंची दर्शविते,ते मर्यादित जगलेच नाही त्यांचं कार्य अमर्याद आहे असे प्रतिपादन आ लहुजी कानडे यांनी सर्वधर्मसमभाव परिषदेच्या विचारमंचावरुन केले
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर,आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र, अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद श्रीरामपूर व लोकहक्क फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पुण्यस्मरणार्थ सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर यांठिकाणी सर्व धर्म समभाव परिषद आयोजित करण्यात आली होती
प्रथमतः सर्वधर्मसमभाव परिषदेचे आयोजकांचे कौतुक करणं आवश्यक आहे.कारण सर्व धर्मांचे धर्मगुरू एकत्र
येणे संयोजकाचा गौरव आणि श्रीरामपूरकरांचा अभिमान आहे असे गौरवशाली सुभाषित डॉ शुभम कांडेकर महाराज यांनी केले.मौलाना अकबर अली सय्यद यांनी सर्व धर्मांचे धर्मगुरू एकत्र येऊ शकतात.मग धर्माला मानणारे का एकत्र येत नाहीत, श्रीरामपूरात आझाद मैदानावर सर्वधर्मसमभाव परिषदेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी संयोजकाकडे केली
याप्रसंगी लोयोला दिव्यवाणी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.अनिल चक्रनारायण,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे,जैन समाजाचे मा.अध्यक्ष गुलाब झांजरी,श्रीरामपूर महानुभव पंथाचे महंत दत्तराज बाबा पंजाबी,वाचन संस्कृतीचे अध्यक्ष प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानचे संस्थापक सुकदेव सुकळे, दत्तनगर ग्रामपंचायतचे मा.सरपंच पी एस निकम,प्रकाश किरण प्रतिष्ठान चे अध्यक्ष लेविन भोसले यांनी फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचा गौरव करून आदरांजली अर्पण केली.
सुरुवातीला कु.रोहिणी गायकवाड व अंध गायक विकास साळवे यांनी सुमधुर गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी केले.फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याची माहिती आसान दिव्यांग संघटना प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी यांनी दिली.आभार अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम,लोक हक्क फौंडेशनचे संस्थापक अशोक कानडे,सुधाकर बागुल,सौ.स्नेहा कुलकर्णी,सौ. साधना चुडिवाल,सुनिल कानडे, विश्वास काळे,सौ.विमल जाधव,विजय कुऱ्हे,प्रकाश सावंत पोपट भाऊसाहेब तोरणे शरद पंडित पास्टर योगेश ठोकळ शरद पंडित प्रतिभा पंडित निशिकांत पंडित लुसिया तापसे विलस पठारे रविंद्र गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.