Home उतर महाराष्ट्र DAY-NULM योजनेअंतर्गत राज्यातील नागरी भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना मिळाली Udyoginimart पोर्टलद्वारे...

DAY-NULM योजनेअंतर्गत राज्यातील नागरी भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना मिळाली Udyoginimart पोर्टलद्वारे हक्काची ऑनलाईन बाजारपेठ.

125
0

आशाताई बच्छाव

1000600455.jpg

DAY-NULM योजनेअंतर्गत राज्यातील नागरी भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना मिळाली Udyoginimart पोर्टलद्वारे हक्काची ऑनलाईन बाजारपेठ.

अहमदनगर, दिपक कदम: स्थानिक गरजा ओळखून बचत गटातील महिलांनी आपले उत्पादन निर्माण करून ब्रँड करावा व पोर्टल प्लॅटफॉर्म चां वापर करून बचत गटाने व्यवसाय करावा. त्यामुळे निश्चितच प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील असे मत नगरपरिषद प्रशासन संचालनाचे संचालक तथा आयुक्त मनोज रानडे यांनी केले.
केंद्र शासन पुरस्कृत “दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान” (DAY-NULM) अंतर्गत राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई आणि टिम फाउंडेशन, नाशिक यांच्या कृतिसंगमाने udyoginimart हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
Udyoginimart.in या संकेतस्थळाचे अनावरण मा. श्री. मनोज रानाडे (भा.प्र.से), आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते नाशिक येथे हॉटेल एक्प्रेस ईन येथे शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमास नगरपरिषद प्रशासन संचालनालयातील सह आयुक्त शंकर गोरे, नाशिकचे प्रादेशिक सहआयुक्त नितीन पवार , नाशिक जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, पुणे विभागाचे उपयुक्त दत्तात्रय लांघी, नासिक महानगरपालिका उपायुक्त अजित निकत, अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त. डॉ. विजयकुमार मुंढे, डॉ. संगीता नांदूरकर, डॉ.मेघना वासनकर, टीम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर आडकर,राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व राज्य अभियान व्यवस्थापक व अधिकारी तसेच राज्यातील DAY-NULM योजनेअंतर्गत काम करणारे सर्व शहर अभियान व्यवस्थापक, सहा.प्रकल्प अधिकारी व स्वयंसहाय्यता बचत गटांचे राज्यातील शहरस्तरीय संघाचे अध्यक्ष व सचिव असे एकूण २५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udyoginimart.in या संकेतस्थळामुळे राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ऑनलाईन बाजारपेठ आज पासून उपलब्ध झाली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून बचत गटांनी बनविलेले गुणवत्तापुर्ण उत्पादने योग्य दरात उपलब्ध झाले आहेत. या संधीमुळे राज्यातील स्वयंसहाय्यता बचतगट आर्थिक सक्षम होऊन महिलांच्या सक्षमीकरणास मदत होणार आहे.
या पोर्टलवर नागरी भागातील बचत गटांची 300 प्रॉडक्ट ऑनलाईन करण्यात आले. नागरिकांनी जास्तीत जास्त घरघुती वापरातील वस्तु udyoginimart.in या पोर्टलवरून खरेदी करावे व महिला बचतगटाना आर्थिक सक्षम करण्यास सहकार्य करावे असे आवाहन मा. मनोज रानडे (भा.प्र.से) आयुक्त तथा संचालक यांनी केले.
यावेळी राज्य व्यवस्थापन कक्षाचे प्रसाद राजेभोसले, निलेश डांगे, सिद्धेश्वर काळे, रवींद्र जाधव, नासिक मनपाचे संतोष निकम,अहमदनगर महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक निलेश शिंदे, सुप्रिया घोगरे,देवळाली प्रवराचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, राहुरी नगरपरिषदेचे बाबासाहेब राऊत, पाथर्डी न. पा चे अनिल कोळगे, राहता चे अंकुश कुसळकर, श्रीरामपूर च्या शहर अभियान व्यवस्थापक श्रीमती रेखा चाटे यांच्यासह अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर स्तरीय संघाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

 

Previous articleअण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे आहे – आ. कानडे
Next articleलाडकी बहिण व लाडका भाऊ सारखी लाडका दिव्यांग योजना करिता प्रयत्न करू – तहसीलदार मिलिंद वाघ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here