Home उतर महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे आहे – आ. कानडे

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे आहे – आ. कानडे

60
0

आशाताई बच्छाव

1000600447.jpg

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे आहे – आ. कानडे
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
काँग्रेस पक्षाचच्यावतीने आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. कानडे व मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी आ. कानडे यांनी कर्मवीर पुतळ्याजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ते पुढे म्हणाले की, आजही अनेक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्या चा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात अण्णाभाऊंच्या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती ही चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.
लोकमान्य टिळक हे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील महत्त्वाचे व प्रभावशाली नेते होते. भारतीय अशांततेचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या टिळकांनी आपल्या शक्तिशाली भाषणांनी आणि लेखनाने अनेकांना प्रेरित केले. त्यांचा स्वराज्यावर (स्वराज्य) दृढ विश्वास होता आणि त्यांनी भारतीयांना त्यांच्या संस्कृतीचा आणि वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही त्यांची घोषणा अनेक स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक मोठा आवाज बनली होती, असे आ. कानडे म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश बोर्डे, सचिन जगताप, रमेश आव्हाड, सचिन कोळसे, माऊली चोथे, दिलीप अभंग, श्री. पवार , देवराय, सतिश जाधव, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शहरातील विविध सामाजिक संघटना व मंडळांनी आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमास भेटी देऊन आ कानडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here