Home पुणे हॉटेल व्यावसायिकांनी एका महिन्याच्या आत व्यवसाय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे – आयुक्त...

हॉटेल व्यावसायिकांनी एका महिन्याच्या आत व्यवसाय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे – आयुक्त शेखर सिंह

39
0

आशाताई बच्छाव

1000561616.jpg

हॉटेल व्यावसायिकांनी एका महिन्याच्या आत व्यवसाय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे – आयुक्त शेखर सिंह
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
महापालिका हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांनी एका महिन्याच्या आत व्यवसाय इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे. तसेच महापालिकेकडून व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि विद्युत सुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्त यांच्या दालनात हॉटेल व्यावसायिक संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त शेखर सिंह होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांच्यासह विविध हॉटेल संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी हॉटेल्स च्या ठीकाणी करावयाच्या अग्निशामक यंत्रणेविषयी सविस्तर माहिती उप आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
शहरात सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि इतर व्यावसायिक इमारतींची संख्या मोठी आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वावरत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिक इमारतींचे संबंधित व्यवसाय मालकांनी एका महिन्याच्या आत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घ्यावे. तसेच महापालिकेकडून व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, विद्युत सुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
महापालिकेच्या वतीने येत्या काही दिवसात शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, हॉस्पिटल तसेच व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या आस्थापनांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट येथे बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्यास त्यांच्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

Previous articleअनसिंग येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे सहा. अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून मनसेने दिले निवेदन
Next articleवानवडी हॉटेल तसेचअनधिकृत हॉटेल दुकानांवर फिरवला बुलडोझर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here