Home अमरावती बीसीजी लसीकरणासाठी १०,५७२ जन इच्छुक: दर्यापूर तालुक्यातील ८१२८ व्यक्तींनी लसीकरण करण्यासाठी दिला...

बीसीजी लसीकरणासाठी १०,५७२ जन इच्छुक: दर्यापूर तालुक्यातील ८१२८ व्यक्तींनी लसीकरण करण्यासाठी दिला नकार 

38
0

आशाताई बच्छाव

1000543257.jpg

बीसीजी लसीकरणासाठी १०,५७२ जन इच्छुक: दर्यापूर तालुक्यातील ८१२८ व्यक्तींनी लसीकरण करण्यासाठी दिला नकार
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (दर्यापूर)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शहर व तालुक्यात राष्ट्रीय रोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत२०२५ पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी १८ वर्षावरील अति जोखीम असलेल्या नागरिकांचा बीसीसी लस देण्यासाठी सर्वे केला. त्यामध्ये ग्रामीण भागातील ४ आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ८५,८४० व्यक्तींचा सर्वे केला. त्यातील १०,५७२ केली.८, १२८ व्यक्तींनी ही लस घेण्यास नकार दिला असल्याचे सर्वे वर मध्ये आढळण्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन गोळे यांनी दिली. राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रम अंतर्गत बीसीजी लसीकरणासाठी पात्र असलेल्या जखमीच्या व्यक्तींचा सर्वे केला. हा सर्वे १७० आशा कार्यकर्ता व आरोग्य कार्य कर्मचाऱ्यांनी दरम्यान कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ३५ हजार ९१७ घरांचा सर्वे केला. बीसीसी लसीकरणासाठी १८ वर्षावरील ८५ हजार ८४० व्यक्तींची नोंद झाली अशी माहिती क्षयरोग प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक सुनील टाक यांनी दिली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत २०२५ पर्यंत देश टीवी मुक्त करण्यासाठी सर्व स्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील आमला, चंद्रपूर, योवदा, राम तीरत या चार आरोग्य केंद्रातील १८ वर्षावरील अधिक जखमीच्या नागरिकांना ही लस देणार चाय मुक्तीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर व्यापक प्रमाणात क्षय रुग्नेची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दर्यापूर तालुक्यात चार गट तयार केले असून, अशा कार्यकर्ते यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वे केला. त्यानुसार लसीकरण नास अनुकूल नागरिकांचे वर्गीकरण केले आहे. तर दर्यापूर शहरात आरोग्य कर्मचाऱ्याकडून सर्वेचे काम सुरू असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. तालुक्यातील आमला आरोग्य केंद्रात ४७२६ पात्र तर १८४८ बीसीजी साठी इच्छुक, चंद्रपूर ५९८८ व्यक्तीपैकी ४०३९ पात्र, २६९४ जन घेण्यास इच्छुक आहेत. यवदा आरोग्य केंद्रात५३३० व्यक्ती पात्र असून ३३२१ जण इच्छुक आहेत. रामतीर्थ आरोग्य केंद्रांतर्गत २६५६ पात्र असून त्यापैकी इच्छुक १३६४ आहेत. एकूण इच्छुकांची टक्केवारी ५६.४३ आहे. या लसीकरणासाठी इच्छुक नसणाऱ्यांची टक्केवारी ४३.४७ टक्के आहे असे तालुकाधिकारी डॉक्टर सचिन गोळे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here