Home बुलढाणा पोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र…

पोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र…

31
0

आशाताई बच्छाव

1000535422.jpg

पोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बु‌लडाणा :-बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मधील रिक्त असलेल्या 125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.

पोलीस दलातील 125 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण 8 हजार 531 आवेदन अर्ज प्राप्त झाले. यातील 5 हजार 960 उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. या मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण घेऊन 3 हजार 342 उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. यातून प्रवर्ग निहाय 1:10 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र ठरले आहेत.

या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सुचना देण्यात आल्या आहेत. पोलिस शिपाई पदाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. 19 जून ते 1 जुलै 2024 या दरम्यान उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांच्या गुणाच्या गुणवत्तेनुसार संबंधीत प्रवर्गातील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणात पात्र असलेले एकूण 1 हजार 366 उमेदवारांची निवडयादी buldhanapolice.gov.in, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी 3 तास अगोदर म्हणजेच सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेश पत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे.

लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यन्वीत राहणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन, अमिषाला बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करुन द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

Previous articleहोते रेती,महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने केली कारवाई, कारवाईत सात टिप्पर जप्त..
Next articleईश्वराच्या नामस्मरणात सुखद लहर निर्माण करण्याची ताकद असते.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here