Home पुणे पिंपरी चिंचवड चे भाजपचे शहरअध्यक्ष शंकर जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी केले दीक्षाभूमीला अभिवादन

पिंपरी चिंचवड चे भाजपचे शहरअध्यक्ष शंकर जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी केले दीक्षाभूमीला अभिवादन

52
0

आशाताई बच्छाव

1000528069.jpg

पिंपरी चिंचवड चे भाजपचे शहरअध्यक्ष शंकर जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी केले दीक्षाभूमीला अभिवादन
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
एका अविस्मरणीय क्षणाचे …. साक्षीदार झाले पिंपरी चिंचवड मधील मा. नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते
पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे.त्यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते असे ७० कार्यकर्त्यांना नागपूर येथील दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी नेले.शंकरभाऊ जगताप यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला आमच्या सोबत भेट दिली आणि आम्हा अंतकरणातून एक अतिशय भावनिक अनुभव आला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे ठिकाण पाहून, आम्हांला बाबासाहेबांविषयी आणि बौद्ध धर्माविषयी एक अनोखी श्रद्धा व प्रेम जागृत झाले.दीक्षाभूमी ही केवळ एक स्थळ नाही,तर ती एक प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांनी या पवित्र स्थळावर आपल्या अनुयायांसमवेत बौद्ध धर्म स्वीकारला होता,ज्यामुळे त्यांना सामाजिक न्याय आणि समानतेची दिशा मिळाली.या घटनेची जाणीव होताच,आमचे हृदय एकदम भरून आले.
डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचे आणि त्यागाचे स्मरण करून,शंकरभाऊंना वाटले की,आपल्याला बाबासाहेबांची शिकवण अधिक दृढतेने पाळावी.बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने जगात शांतता,करुणा आणि बंधुता निर्माण होईल.या भेटीने शंकरभाऊंना डॉक्टर बाबासाहेबांनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार हे आजही किती ताजेतवाने आहे हे समजले.बौद्ध धर्माच्या माध्यमातून जगात प्रेम,शांतता आणि न्याय यांची स्थापना कशी होईल हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून जाणले.
दीक्षाभूमीच्या पवित्र भूमीवर उभे राहून शंकरभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाला अभिवादन केले.त्यांच्या अंतकरणातील प्रेम आणि श्रद्धा यामुळे ते आणि आम्ही अधिक प्रेरित झालो आणि त्यांनी आपल्या जीवनात बाबासाहेबांच्या शिकवणीचे पालन करण्याचा निश्चय केला.
या प्रसंगी शंकरभाऊ जगताप यांनी तेथील वास्तुसंग्रालयातील एक एक वस्तू आणि फोटो पाहून त्याची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण क्षण आणि त्यांचे कार्य समजावून सांगताना शंकरभाऊ यांनी कार्यकर्त्यांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली.त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनातील वृत्तांत आणि त्यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले.यावेळेस संजय मराठे म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अभिमान वाटला की शंकरभाऊंना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी एवढा अभ्यास आहे.” हे वक्तव्य शंकरभाऊ यांच्या ज्ञान आणि समर्पणाची साक्ष देणारे आहे.शंकरभाऊंनी दीक्षाभूमीला अभिवादन करताना “बुद्ध वंदना नमो तसं भागवतो आराहतो” म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.त्यांनी या शब्दांचा संपूर्ण अर्थ कार्यकर्त्यां समवेत समजावून घेतला.डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व आणि त्यांचे समाजासाठी केलेले कार्य अधोरेखित केले असेही म्हणाले.या उपक्रमातून शंकरभाऊ जगताप यांनी कार्यकर्त्यांमध्ये डॉ.आंबेडकरांविषयी आदर आणि त्यांच्या विचारांचे पालन करण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांना एक वेगळी दिशा आणि ऊर्जा मिळाली.
शंकरभाऊ जगताप यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे अभिवादन करण्यासाठी नेले,त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्या सोबत सदैव खंबीरपणे उभे राहू ही पवित्र दीक्षाभूमी मध्ये आम्ही शंकरभाऊंना ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here