Home बुलढाणा घरच्यांच्या जाचाला कंटाळून काठोडा येथे होणार आत्मदहन चिखली तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल….

घरच्यांच्या जाचाला कंटाळून काठोडा येथे होणार आत्मदहन चिखली तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल….

45
0

आशाताई बच्छाव

1000524030.jpg

घरच्यांच्या जाचाला कंटाळून काठोडा येथे होणार आत्मदहन चिखली तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरोचीफ
चिखली:- बुलढाणाचिखली तालुक्यातील मौजे काटोड येथील रविंद्र धोंडगे यांनी दिनांक 3 जुलै २०२४ रोजी चिखली न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन आपली हकीगत पत्रामध्ये नमूद केली आहे
गेल्या २००८ पासून सतत घरघुती कलह वडील,भाऊ,चुलते यांपासून होणारी मानसिक,वित्तीय, भावना दुखावणे हा कार्यक्रम २०२४ आतापर्यंत चालू आहे.
समाजात जगत असताना दुसऱ्याचे दोष दाखवीने आणी आपले लपविणे ही विलक्षण प्रथा आता चालू आहे.जबानी बदलणे,घरे माघारी नावाने करणे,मृतुपत्र करणे असे कार्यक्रम जर माघारी होत असतील आणी खर असून ते दाबल्या जात असेल तर मानसिक तान,वित्तीय हानी,फसवणूक,भावना दुखणे हे होणार,हा त्रास किती सहन करायचे कारण हा त्रास १७ वर्षांपासून सहन करीत आहे.
या सर्वांचा विरोधात दिवानी व फौजदारी न्यायालय चिखली येथे केस दाखल केल्यानंतर चार वर्षानंतर आपसात झाल्यावर नायालयाने निर्णय दिल्यानंतर दहा महिन्यानंतर म्हणजे जुन ,जुले महिन्यात तलाठी यांनी प्रोसेस पूर्ण केली,ते पण विना नोटीस,स्पॉट पंचनामा केला विना नोटीस महसूल विभागाचा मान ठेवून मी रवींद्र सुमन धोंडगे हजर होतो.
मा.न्यायालयाने निकाल देताना त्यावरील बोजा भरणे,आणी गट न ८६ मोजे काटोडा वादग्रस्त धुरे मोजून देण्याचे ठरविले होते.जरी आदेशामध्ये ते लिहले नसले माझ्या,वकील,आणी न्यायमुर्ति यांच्या समक्ष कबूल करून सुद्धा तलाठी साहेबांनी कोणतीही विचारणा न करता सातबारा तयार करून रवींद्र धोंडगे यांच्या सातबारा नोंदीवर ९९००० बोजा देण्यात आला.जो बोजा मी काढला नाही.
जर बोजा वडिलानी भरला नाही,वादग्रस्त धुरे मोजून दिले नाही तर आणी नुकसान भरपाई दिली नाही तर मी आत्मदहन करणार कारण हा त्रास १७ वर्षांपासून आहे त्या जमिनीतील मला काहीही एक मिळाले नाही,२०२४ खरीप पेरणी उलटून जवळपास २५ दिवस होऊन माझी ताब्यातील शेतावर बळजबरी ताबे केलेले आहे,आणी मला पेरणी पासून वंचित केलेले आहे.
सतत च्या जबानी पलटणे,आडमुठे धोरणाला कंटाळून मी मा.तहसील दार तहसील चिखली यांना निवेदन दिले आहे जर मला न्याय मिळाला नाहीतर मी माझ्या कुटुंबासह आत्मदाहन करणार

Previous articleलाडकी बहीण योजनेबाबत ‘या’ अफवा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Next articleजयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here