Home नांदेड मुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद !

मुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद !

35
0

आशाताई बच्छाव

1000496053.jpg

मुखेड येथील संविधान रक्षक कृती समितीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद !

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड -राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगार शेतमजूर यांच्या संसारावर महागाईमुळे मरण अवकळा पसरली असून शासनाकडून मिळणाऱ्या पिक विमा ,पिक कर्ज अनुदान ,मिळणाऱ्या सुविधा, राशन ,निराधारचे अनुदान, सामाजिक अनुदान या सर्व गोष्टी वेळेवर मिळत नाहीत मिळाल्या तरी तुटपुंजा कमीत कमी मिळत आहेत त्यामुळे शेतकरी निराधार यांना न्याय मिळवून देण्यासाठी व मुखेड तालुक्यात विविध विकास कामात गैरव्यवहार होत असून या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षक क्रती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर दिनांक 24 जून रोजी महामोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो मोर्चाकरी सहभागी झाले होते मोर्चे कर्यानी तहसील कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करून संबंधित अधिकारी यांना घेराव आंदोलन केले.
सदरील मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन ते शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आला या मोर्चात दहा हजार शेतकरी, निराधार महिला सहभागी झाले होते. या मोर्चा चे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी केले यावेळी शिवसेनेचे एकनाथ पवार, मा.जि.प.अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर ,शिवसेनेचे मा.जि.प.सदस्य संतोष राठोड,संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉक्टर श्रावण रँपनवाड,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील रावनगावकर,शिवाजी गेडेवाड,जनाबाई नाकाडे मधुकर महाराज बारूळकर, रामराव महाराज भाटेगावकर ,राहुल लोहबंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असून शेतकऱ्यांना खरीप पिकावरच अवलंबून राहावे लागते मुखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या उदासीतेमुळे मुखेड तालुक्याचा विकास खुंटला आहे गोरगरिबाच्या हाताला लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मोर्चे करण्यानी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालया समोर तीन तास ठिय्या आंदोलन करुन तहसीलदार सह संबंधित अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारले या मोर्चाला शिवसेनेचे एकनाथ पवार, दशरथराव लोहबंदे, शिवाजी गेडेवाड,शंकर पवार, दिलीप पाटील बेटमोगरेकर, मधुकर महाराज, रामराव महाराज यांनी संबोधित केले दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्यास संविधान क्रती समीतीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चा यशस्वी होण्यासाठी सरपंच बापुराव कांबळे जुनेकर राहुल लोहबंदे, अशितोष कांबळे, गंगाधर सोंडारे,रियाज शेख,अनिल कांबळे, यांच्या सह अनेकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here