Home बुलढाणा रस्त्याला नाल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरले पावसाचे पाणी…

रस्त्याला नाल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरले पावसाचे पाणी…

37
0

आशाताई बच्छाव

1000495722.jpg

रस्त्याला नाल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरले पावसाचे पाणी…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- लोणार तालुक्यातील कारेगाव येथे जिल्हा परिषद शाळा ही मुख्य रस्त्यावरती असून शाळेमध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्याचे पाणी शिरत आहे जिल्हा परिषद शाळेमध्येच गावाचे मुख्यालय म्हणजे ग्रामपंचायत आहे त्यामध्ये सुद्धा पाणी साचलेले होते. या दोन्ही ठिकाणी पाणी जाण्याचे कारण म्हणजे गावातील मुख्य रस्त्याला नाली नसल्यामुळे गावातून जो मुख्य रस्ता लोणारला जातो त्या रस्त्याला नाली ही राहिलीच नसल्यामुळे जे रस्त्यावरील पाणी हे रस्त्या शेजारील लोकांच्या घरामध्ये व शाळेमध्ये आणि ग्रामपंचायत मध्ये शिरत आहे .ठेकेदाराने मुख्य रस्ता केला पण त्याला नाल्याच केल्या नाही त्यामुळे हा प्रकार घडत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला गावातील नागरिक हे त्रस्त झालेले आहे. त्या मुख्य रस्त्याचे काम दोन ते तीन वर्षापासून सुरू असून ते काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही जर शाळेमध्ये व ग्रामपंचायत मध्ये असे सतत पाणी शिरत राहिले तर शाळेचे आणि ग्रामपंचायत मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या नुसकांनीची जिम्मेदारी कोण घेणार ठेकेदार की बांधकाम विभाग का संबंधित अधिकारी जर ठेकेदारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली ही नाही घेतली तर गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत मिळून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे .गावामधील काही नागरिकांनी ठेकेदारास नाल्याविषयी विचारणा केली असता ठेकेदार हा फक्त उडावा- उडवीचे उत्तरे देऊन नागरिकांना शांत करत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच या मुख्य रस्त्याला समोर एक ओढा लागत आहेत त्या ओढ्यामध्ये सुद्धा ठेकेदाराने नुसते पोंगे गाडून त्याला कडा सुद्धा केलेल्या नाही. आता पाऊसाला सुरुवात होत आहे. जर कधाचीत जास्त पाऊस पाडला आणि त्या पोंग्याशेजारील मुरूम हा पाण्यासोबत वाहत गेला आणि पोंगे उघडे पडले तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या बाबीकडे बांधकाम विभागणे विशेष लक्ष देण्यात यावे आशी मागणी करेगांव येथील नागरिकांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here