Home पुणे पिंपरी चिंचवड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा सत्कार संपन्न

पिंपरी चिंचवड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा सत्कार संपन्न

132
0

आशाताई बच्छाव

1000490867.jpg

पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेसचे तेरा खासदार निवडून आले. प्रचंड परिश्रम घेऊन नानाभाऊंनी कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे नानाभाऊंचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले व आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँगेस पक्षाला भरघोस यश मिळून नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी वाल्हेकर वाडी येथे चालू केलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी च्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे भरत वाल्हेकर यांनी नानाभाऊंना पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात इंदिरा माई स्वस्त थाळी हा उपक्रम राबवण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे असे नाना भाऊंना सुचवले व भरत वाल्हेकर हे कार्य करत असलेले पाहून नानाभाऊंनी त्यांचे कौतुक करत त्यांना या गोष्टी करिता पूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले व मी जातीने या गोष्टीकडे लक्ष देतो असे त्यांनी वचन दिले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.भरत शंकर वाल्हेकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सायलीताई नढे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष श्री. विजय ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. हरिश डोळस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस ग्राहक सेलचे अध्यक्ष झेवियर ऍन्थोनी, श्री. किरण नढे, श्री. संदेश नवले, श्री.आबा खराडे , अध्यक्ष परिवहन सेल श्री. सुरज गायकवाड, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड परिवहन सेल , श्री. फिरोज तांबोळी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. विकास बळवंत कांबळे, श्री. सुदर्शन धाडवे, श्री. विशाल गवळी, श्री. अनिल दहीभाते, श्री. ज्ञानेश्वर बोरकर श्री. संदीप काटे , सौ. विजया कांबळे , श्री. अमिन बोरकर , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर योजने संदर्भात भरत वाल्हेकर व सायली ताई नढे यांना विचारले असता वाल्हेकर वाडी येथे चालु असलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी व स्किल इंडिया अंर्तगत मोफत शिलाई मशीन व कम्प्युटर क्लास ला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभर शाखा स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला व तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष श्री. मोहनदादा जोशी व माजी आमदार श्री. उल्हासदादा पवार व माजी राज्य मंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर यांनी सदर योजनेला शुभेच्छा देऊन पाठींबा दिला.

Previous articleयुवकाची हत्या की आत्महत्या ?
Next articleदुचाकी चोरणारी चौकडी”क्राईम”कडून जेर बंद; ११ दुचाकी जप्त,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here