Home वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात ५०१ वृक्षांचे वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात ५०१ वृक्षांचे वितरण

42
0

आशाताई बच्छाव

1000485464.jpg

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात ५०१ वृक्षांचे वितरण
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २१ जुन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना ५०१ वृक्षांचे वितरण करण्यात आले.
हा समाजसेवी उपक्रम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष राजु किडसे यांच्या नेतृत्वात तथा शहराध्यक्ष रवि वानखडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, मनसे कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश फड, वाशिम मंगरुळनाथ जिल्हा संघटक गजानन कढणे, वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे, सहचिटणीस देविदास जैताडे, अशोक इंगळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रविन घोडे, शुभम महाजन, गुणाजी घोंगडे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, जिल्हा उपअधिक्षक सुनिलकुमार पुजारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांच्या कार्यालयात ५०१ बहुउपयोगी वृक्षाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मनसे सैनिकांची बहूसंख्येने उपस्थिती होती.

Previous articleवटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, संवर्धन व संगोपनाचा संकल्प करा – प्रा. संगीता इंगोले
Next articleवाशिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव अप्रतिम उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here