आशाताई बच्छाव
कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा सिंदखेडराजा तहसील कार्यालयात पुन्हा पुन्हा तेच अधिकारी कशासाठी ?
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :-सिंदखेडराजा हे नाव संपूर्ण जगामध्ये राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळासाठी ओळखले जाते आणि हेच सिंदखेडराजा तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ११५ खेडेगाव चा संबंध तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त येत असतो,सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये अनेक विद्यार्थी शेतमजूर शेतकरी हे कामानिमित्ताने दूरवरून येत असतात कधी त्यांची कामे होतात तर कधी होत नाही,पैशाची लालच असलेले काही कर्मचारी हे खुर्चीवर कमी व बाहेर जास्त फिरत असतात,हा विषय वेगळा,परंतु ज्यांनी सिंखेडराजा तहसीलमध्ये आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण केला असे कर्मचारी पुन्हा पुन्हा सिंदखेडराजा तहसीलमध्ये कशासाठी हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे ,अगोदरच सिंदखेडराजा तहसीलमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून श्रीमती डॉ . आस्मा मुजावर ह्या नायब तहसीलदार पदावर कार्यरत होत्या ,त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली देऊळगावराजा येथे झाली,परंतु परत त्या १४ जूनला निवासी नायब तहसीलदार म्हणून सिंदखेडराजा तहसीलमध्ये रुजू झाल्या ,गेल्या तीन-चार महिन्यापासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नाही अनेक प्रकरणे अनेक उत्पन्नाचे दाखले सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नव्हते ही गोष्ट वेगळी असली तरी कायमस्वरूपी तहसीलदार व कायमस्वरूपी निवासी तहसीलदार हे नवीन आतापर्यंत का मिळू शकले नाही, सिंदखेडराजा तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून राहिलेल्या डॉ . मुजावर मॅडम यांना सिंदखेडराजा तालुक्याचा दांडगा अभ्यास आहे अनेक रेतीचे ट्रॅक्टर त्यांनी पकडले आहे अनेक नागरिकांसोबत राजकीय पुढार्यांसोबत त्यांचे हित संबंध आहेत, असे असताना सुद्धा परत तेच कर्मचारी कशासाठी ?
अगोदरच सचिन जैस्वाल यांच्यामुळे सिंदखेडराजा तहसील कार्यालय कलंकित झाले आहे,आणि आता तेच तेच कर्मचारी पदावर रुजू होत आहे,
त्यामुळे जे होणारे नागरिकांची कामे आहेत त्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे काही नागरिक जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत निवेदन देणार असल्याचे माहिती समोर आली असून त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती निवासी नायब तहसीलदार म्हणून घेण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे , एकदा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा दीड ते दोन वर्षात परत त्याच ठिकाणी पदावर राहणे कितपत योग्य आहे ? याकडे शासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे
संदीप बंगाळे यांच्याकडे नायब तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला होता त्यांनी तातडीने दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले निकाली काढले तसेच अवैध रेतीला माळा घालण्यासाठी ट्रॅक्टर टिप्पर सुद्धा पकडले त्यांची कामगिरी दमदार आहे हे विसरता कामा नये