Home भंडारा विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता...

विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव

71
0

आशाताई बच्छाव

1000417355.jpg

विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव

बेटाळा येथील संस्कार शिबिरात मार्गदर्शन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी):- शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ, आणि कलेची आवड निर्माण होते. व बुध्दीला चालना मिळत असते. तसेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी स्वत:ला सतत गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध कलांचा विकास होऊन पुढे विद्यार्थी कलासक्त जीवन जगू शकतात. तसेच मातृभाषा बरोबर इतर ही भाषा अवगत करावे. विकासाची कास अविरत चालू ठेवावी. त्याकरिता विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे असे प्रतिपादन तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (आय पी एस) रष्मिता राव यांनी केले.
त्या ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित बालसंस्कार ग्रिष्मकालीन निःशुल्क संस्कार शिबिर, शैक्षणिक व क्रिडा मार्गदर्शन शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
संस्कार शिबिर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बेटाळा येथील सरपंचा सौ. रेश्माताई ईश्वरकर, माजी मुख्याध्यापक विनायक मोथारकर, प्रमुख मार्गदर्शक सावली नर्सिंग होमचे डॉ. रत्नाकर बांडेबूचे, आंतराष्ट्रीय खेळाडू कु. सुशिकला दुर्गाप्रसाद आगाशे, सत्कारमूर्ती अनिल भालेराव, पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, रामप्रसाद मस्के, केंद्रप्रमुख बंडूभाऊ खोब्रागडे, ग्रामीण संस्कार शिबीर जिल्हा प्रमुख तथा पत्रकार विलास केजरकर, सहाय्यक शिक्षक लिलाधर वैद्य, मुख्याध्यापक जे. एस. आंबिलढुके, माजी मुख्याध्यापक बी. आर. रहाटे, उपसरपंच प्रशांत राऊत, एम. एम. कानेकर, योग शिक्षक निकेश सार्वे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ज्याप्रमाणे कुंभार हा ओल्या मातीला पाहिजे तसा आकार देत असतो. त्याच बरोबर ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी विद्यार्थांना संस्कारमय करण्यासाठी धडपडत करत आहेत. आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना बालपणापासून चांगल्या सवयी लावणे महत्त्वाचे आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षा देऊन उच्च पदावर जाता येते. मात्र संस्काराचे धडे केवळ कुंटुंब, परिसर व चांगल्या संगतीमुळे मिळत असतात. लहान मुले सुद्धा मोठ्यांचे अनुकरण करत असतात. आपल्या कुंटुंब सुखी समाधानी पहायचे असल्यास त्याकरिता पालकांनी व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या कोवळ्या बाल मनावर योग्य संस्कार होणार असे प्रतिपादन सावली नर्सिंग होमचे डॉ. रत्नाकर बांडेबूचे यांनी केले.
कुठलीही स्पर्धा कठिण असते. तिला समोर जाण्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागतात. अपयश आले म्हणून खचून न जाता सदैव प्रयत्न करावे. मनात चांगले, वाईट विचार येत असतात. आणि चांगले विचार अंमलात आणावे. स्पर्धेत अयशस्वी झाल्याशिवाय आपल्यातील कमजोरी ओळखता येत नाही. आणि त्यातूनच यश संपादन करता येते असे मत आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू कु. सुशिकला आगाशे हिने संवादातून व्यक्त केले.
कार्यक्रमा दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक अनिल भालेराव, आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू कु. सुशिकला आगाशे व वडिल दुर्गाप्रसाद आगाशे तसेच तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस रष्मिता राव यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि चैतन्य बळीराम ठोंबरे यांने इयत्ता १० वी CBSE मध्ये ९२ % व शिवानी भोयर हिने एन एम एस परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या अफाट अंधारात आपणच आपल्याला स्वयंप्रकाश पूरवायला हवा. क्रांती नव्या बदलाची, बदल नव्या अध्यायाचा, अध्याय तुम्हा आम्हा सर्वांचा तसेच कृतीशील युवा प्रगतिशील देश या संकल्पनेतून ग्रामीण विकास संघटना बेटाळा येथील संस्कार चळवळीच्या काही युवकांनी पुढाकार घेऊन ग्रिष्मकालीन निःशुल्क बालसंस्कार शिबिर, शैक्षणिक व क्रिडा मार्गदर्शन शिबीराची सुरूवात तीन वर्षांपासून केली आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांनी दिल्या.
गावातील नागरिक हे विविध व्यसन करतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे गावातील व्यसन बंद करण्यास प्रयत्न करावे अशी खंत बेटाळा येथील सरपंचा सौ. रेश्माताई ईश्वरकर यांनी तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव यांच्या कडे व्यक्त केली.
उपस्थितांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन संस्कार शिबिराचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शकांनी गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना, तरुणांना आणि महत्वाचे म्हणजे पालकांना आपला पाल्य घडविण्यासाठी व गावाचा, शाळेचा सर्वांगीण विकास कसा करायचा यावर विशेष मार्गदर्शन केले. बाल संस्कार शिबीर समारोप तसेच विद्यार्थी व पालकांकरिता विशेष मार्गदर्शन सोहळ्यात विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, गावातील व परिसरातील तरुण मंडळी, शिक्षक वृंद, ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थी ४२अंश तापमान असुन सुद्धा उपस्थित मार्गदर्शकांच्या मनसोक्त संभाषणात मोलाची साथ दिली. उपस्थितांच्या हस्ते शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र राऊत, श्रीकांत नंदूरकर व कृष्णा कानेटकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रामीण विकास संघटनेचे संचालक कार्तिक डोरले यांनी केले तर उपस्थितांचे आभार संघटनेचे सहकोषाध्यक्ष अमीर शेख यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महेंद्र राऊत, आमिर शेख, अविनाश नंदूरकर, प्रशांत कुंभरे, अविनाश राऊत, विलास डोरले, सचिन पडोळे, भूषण बोरकर, शुभम लिल्हारे, क्रिष्णा कमाने, वासु कुंभलकर, शाहिणा शेख, संगीता समरीत, वैशाली समरीत, शितल चौधरी, सुनिल समरित, चैतन्य ठोंबरे, विधी बान्ते, श्रृती ईश्वरकर, लावण्या समरित, समिक्षा कुकडे, सर्वरी डोरले, शिवानी भोयर, आरूषी ईश्वरकर, रूद्र डोरले, तेजश्विनी ईश्वरकर, आदेश बान्ते, माही राऊत, सर्वरी ईश्वरकर, वंंशिका बोरकर, आकांक्षा हरकंडे, आरजू नेरकर, ऋतुजा बागडे, वंंशिका ईश्वरकर, चैताली नेरकर, मिनल समरित, श्रेया राऊत, धनश्री बुराडे, सानिया कुकडे, स्नेहा वनवे, सायना रामटेके, श्रीनिथी चरडे, समिक्षा शहारे, अनुजा ईश्वरकर, नेहा जिभकाटे तसेच पालकवर्ग, ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous articleत्‍या नराधमाने मावस बहिणीवर ठेवली पापी नजर आरोपीस दहा वर्षे कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय…
Next article१ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here