Home बीड परळी नगरपरिषदच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग

परळी नगरपरिषदच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग

66
0

आशाताई बच्छाव

1000413450.jpg

परळी नगरपरिषदच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: २९ परळी नगर परिषद च्या वतीने मोठ्या नदी व नाल्यांचे साफसफाई व स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. मान्सून तोंडावर आला असताना नगरपालिका क्षेत्रातील लहान मोठ्या नाल्यांची सफाईचे कामे वेगाने सुरू आहेत. यासाठी जेसीबी ट्रॅक्टर आदी मशनरीसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करून साफसफाई करण्यात येत असल्याची माहिती देऊन नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री.त्रिंबक कांबळे यांनी केले आहे. शहरांमध्ये नाल्यांमध्ये कचऱ्यामुळे पाणी साचू नये आणि नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी परळी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सून पूर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. त्रिंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे, स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, विशाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विश्वेश्वर डुबे, विलास केदारी, सुरवेश्वर वाल्मिकी, राजाभाऊ जगतकर, राजाभाऊ गायकवाड जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे, धनराज कसबे व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील मोठे नाले आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. परळी शहरातील सरस्वती नदी, गोपाल टॉकीज ते सार्वजनिक स्मशानभूमी, उखळवेस ते सिमेंट फॅक्टरी, मलिकपुरा, पंचायत समिती ते नाथ रोड, आझाद नगर (वीटभट्टी पूल) ते रेल्वे लाईन पूल तसेच विविध भागातील नाल्या यासह शहरातील विविध छोट्या-मोठ्या नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्यात येत आहे. यासाठी दोन जेसीबी व पाच ट्रॅक्टरद्वारे व कर्मचाऱ्यांच्या साह्याने साफसफाई करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही साफसफाई करण्यात येणार असून या काळात शहरातील ज्या नाल्यात तुंबल्या आहेत. त्यातील गाळ काढण्यात येणार असून नागरिकांनी आपला कचरा घंटागाडी मध्ये टाकावा असे आवाहन स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हे सर्व कामे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती दिली आहे. शहरात कोणतेही काम करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक असतो. पावसाळ्यात व्यापारी, नागरिकांना त्रास होऊ नये, शहरातील कोणतीही नाली तुंबू नये यामुळे पालिकेने साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. हे कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत मात्र नागरिकांनीही कचरा नालीत टाकून पाणी राहुल जाण्यास अडथळा होईल असे करू नये, कर्मचारी करीत असलेल्या कामांना सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी श्री. त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.

Previous articleपत्नी मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीत जबर मारहाण
Next articleसांगवीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून; पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर थरार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here