Home युवा मराठा विशेष भारतामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे

भारतामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे

57
0

आशाताई बच्छाव

1000369384.jpg

हवेली, पुणे श्री संजय वाघमारे : उत्सव लोकशाहीचा, हक्क मतदानाचा : भारतामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज १३ मे २०२४ संपूर्ण देशात ९६ ठिकाणी तर महाराष्ट्रामध्ये ११ ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज मतदानाच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामध्ये काही शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे, जळगाव मध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार, मावळमध्ये श्रीरंग मारणे विरुद्ध संजोग वाघेरे, अहमदनगर मध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध धंगेकर अशा अनेक दिग्गजांनी आपली प्राणप्रतिष्ठा पणाला लावली आहे. या सर्व दिग्गजांनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व नागरिकांनी त्यांनी आवाहन केले आहे की आपणही आपला या लोकशाहीचा उत्साहामध्ये सामील होऊन मतदानाचा हक्क बजावा व लोकशाहीला मजबूत करावं. जास्तीत जास्त लोकांनी आपला हा हक्क बजावला पाहिजे.

Previous articleजागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleउद्योजक व कामगारांनी भाजपा कायम ठेवावा: प्रमोद वाकोडकर ना. दानवे यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहतीत भेटी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here