Home बीड अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळातर्फे कामगार दिन उत्साहात साजरा

अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळातर्फे कामगार दिन उत्साहात साजरा

60
0

आशाताई बच्छाव

1000332739.jpg

अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळातर्फे कामगार दिन उत्साहात साजरा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०१ आज बुधवार रोजी महाराष्ट्राचा वर्धापन दिन आणि कामगार दिन अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. कामगारांच्या प्रश्नांसदर्भात त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल राहुत असेही अ‍ॅड.मनोज संकाये यांनी सांगितले. परळी शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अ‍ॅड.मनोज संकाये मित्र परिवाराच्या वतीने आज विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या कामगारांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील कामगार उपस्थित होते प्रकाश सिताप, राजेश गोदाम, प्रवीण घाडगे, गोविंद दहिवाळ, राम शहाणे, आकाश कसबे, वैभव भारती, रशिकांत बेदरे, कामगार उपस्थित होते. यावेळी बोलतांना अ‍ॅड.मनोज संकाये म्हणाले की, १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्व सांगितले, ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती करिता १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.याचे स्मरण केले पूर्वीच्या काळी कामगारांना कमी मोबदल्यात जास्त काम करून घेतले जायचे, सुट्टी मिळत नसायची, कोणत्याच सुविधा मिळत नसत या अन्यायाविरुध्द आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांची चळवळ उभी राहिली व कामगार संघटनांची निर्मिती झाली १ मे १८९१ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर १ मे हा कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, सर्व क्षेत्रातील कामगारानीआपल्या पूर्वजांनीआंदोलने, मोर्चे, केलेले अथक परिश्रम घेतले याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये असे सांगितले. कार्यक्रमास अ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळाचे जिरेवाडी चे उपसरपंच राहुल कांदे, एस पी मुंडे सर, मोहन चव्हाण (पत्रकार), राम जोशी, मुंजाभाऊ साठे शिवा बडे , काशिनाथ सरवदे, सुंदर आव्हाड, संतोष कांबळे, राम चाटे, मुंजाभाऊ गरड, बाळू गुट्टे, वसंत मुंडे, प्रवीण रोडे, जयसिंग गायकवाड, राजू कांदे, उपस्थित होते.

Previous articleअमरावती विद्यापीठ चा निवडीत पुरस्कारघोळ. __________
Next articleडी पाँल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here