Home अमरावती ४५ विहिरीचे अधिग्रहण, आठ गावाची तहान ११ टँकरवर. पाणी टंचाईची त्रीवता वाढली.

४५ विहिरीचे अधिग्रहण, आठ गावाची तहान ११ टँकरवर. पाणी टंचाईची त्रीवता वाढली.

53
0

आशाताई बच्छाव

1000332715.jpg

४५ विहिरीचे अधिग्रहण, आठ गावाची तहान ११ टँकरवर. पाणी टंचाईची त्रीवता वाढली.
_________
दैनिक युवा मराठा.

पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
एप्रिल महिन्यातील रखरखात उन्हामुळे जल स्तोत्र कोरडे पडत असल्याने अनेक गावांना कोरड लागली आहे. पाणीटंचाईची त्रिवता वाढल्याने तात्पुरता उपाययोजना म्हणून सध्या स्थितीत खाजगी ४५ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले तर ११ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागिले जात आहे. पावसाळ्यात चांदूरबाजार वगळता १३ही तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे जमिनीचे पूर्णभरण न झाल्याने मार्च पश्चात त भूजल स्तरात कमी येत आहे. त्यामुळे अनेक गावाचे जल स्तोत्र आता कोरडे पडत असल्याने पाणीटंचाई ची दहा हक्क वाढली आहे. त्या तुलनेत आचारसंहितेत अडकल्याने अनेक गावे तहानले आहे. आयोगाचे निर्देशानुसार केवळ टँकर सुरू करणे व विहिरीचे अधिग्रहण यालाच मुभा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाच्या साप्ताहिक अहवालानुसार सध्या स्थिती अमरावती तालुक्यात ७, भातकुली १, चांदुर रेल्वे ३, नांदगाव खंडेश्वर १६, अचलपूर ३, मोर्शी ११ तसेच वरुड व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी दोन खाजगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. टँकरवर सध्या स्थितीत चांदुर रेल्वे तालुक्यात सावंगी मगरापूर चिखलदरा तालुक्यातील बेला (सलोना), मोथा, बहादपूर, गौलखेडा बाजार, धामकटडोह येथे प्रत्येकी१ तर खडीमल येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचे तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद येथील धक्कादायक घटना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू.
Next articleअमरावती विद्यापीठ चा निवडीत पुरस्कारघोळ. __________
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here