आशाताई बच्छाव
म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे):--साक्री तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील गणरायाचे काल सातव्या दिवशी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. सकाळी पाच जोडप्यांची हस्ते महाआरती करून गणरायाची ककाणी गावठाण मधून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव उत्तमराव बेडसे, संचालक बारकू बेडसे,अरुण बेडसे, रावसाहेब बेडसे,एन.डी. शिंदे, रवींद्र बेडसे, निंबा नाना बेडसे, डॉ. अनिल बेडसे, हरी सोनवणे, प्रमोद सोनवणे, नानाजी मोहिते आदी, सौ. सुवर्णा बेडसे उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक भटू वाणी यांच्या मार्गदर्शनाखालीव्ही. वाय.कुवर, पी.डी. शेवाळे, जी.एम. मारणर, के.व्ही. देवरे, एन.डी. शिंदे, बी.आर. सोनवणे, प्रसाद बेडसे, सुषमा महाले, कुणाल बेडसे, दीपक पवार, बापू गायकवाड, दयाराम पवार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्राम पुरोहित गणू महाराज दीक्षित यांनी गणेश विसर्जना निमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. तसेच गणेश उत्सव काळात विद्यालयात संगीत खुर्ची, मडके फोड, गाढवाला शेपटी लावणे, गोणपाट शर्यत, रान भाजी मेळावा तसेच शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.