आशाताई बच्छाव
मल्हार हिल कॅम्पसमध्ये बैल पोळा साजरा
संदीप गांगुर्डे
पिंगळवाडे
सटाणा येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर भाक्षी येथे पोळा हा बळीराजाच्या जिवाभावाचा सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कौतिकपाडे, मुळाने व भाक्षी या गावातील पाच शेजाऱ्यांनी आपल्या सर्जा राजा च्या जोड्या पारंपारिक पद्धतीने सजवून पूजेसाठी आणल्या.विद्यालयात प्रतीकात्मक मातीच्या बैलांची पूजा मांडण्यात आली होती, विकास अधिकारी सुरेश येवला यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पाच शेतकऱ्यांचे व त्यांच्या सर्जा राजांचे विद्यालयातील पाच सुवासिनींनी औक्षण करून पारंपारिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना देण्यात आला.शालेय आवारात फिरणारा बैल पोळा हे विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे,आदर्श शिक्षक अविनाश अहिरे,नंदकिशोर शेवाळे, किरण सोनवणे आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो “असे मत व्यक्त केले.
ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, भाऊसाहेब ठुभे,पवन नाडेकर,सुजाता पाटील, गोकुळ दातरे, शेखर अहिरे ,हर्षली मोरे, पुनम जाधव, सिंधू पवार, जयश्री देवरे,सुजाता गुंजाळ,वृषाली जाधव,दादाजी माळी, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे,सविता जाधव, सविता अहिरे,गायत्री देवरे, सुजाता पाटील ,उषा रौंदळ,तेजस्विनी निकम ,स्नेहल वाघ,स्नेहल शिंदे,किरण मोरे,साहेबराव खैरनार, सजन देवरे, किरण पवार,आबा शिंदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रेखा आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर कल्याणी गायकवाड यांनी आभार मानले