आशाताई बच्छाव
बळीराजा पेरणीसाठी सज्ज; पावसाची प्रतीक्षा
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
मान्सून लवकर येणार य शक्यतेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांन खरिपाच्या पेरणीची तयारी लवक केली होती. मात्र मान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असलेल बळिराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
. जिल्ह्यात सहा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात खरिपाची पेरण होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राव सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात लागणारे कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरीही या बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये; तसेच बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून आहे. दक्षता घेतली जात आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनच्या माध्यमातून जिल्ह्यात सोयाबीनचे घराचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकरी हे बियाणे वापरणार आहेत. त्याशिवाय खासगी कंपन्यांचे बियाणेही उपलब्ध होणार आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी खत खरेदीही सुरू केली आहे. मात्र अद्यापही पावसाने जिल्ह्यामध्ये दस्तक दिलेली नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत आहे.