Home बुलढाणा २९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार ‘लॉटरी’ !!

२९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार ‘लॉटरी’ !!

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0053.jpg

२९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार ‘लॉटरी’ !!

बुलडाणा ( ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख बूलडाणा ): जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या २९२ ग्राम पंचायतींचा आरक्षण सोडतीचा मुहूर्त अखेर ठरलाय! खरीप हंगामाच्या धामधुमीत व मृग नक्षत्राच्या तोंडावर म्हणजे ६ जून रोजी आरक्षणाची लॉटरी काढण्यात येणार असून १७ जूनला जिल्हाधिकारी याला अंतिम मान्यता देणार आहे.

या २९२ मध्ये बुलडाणा तालुक्यातील १२, चिखलीतील ३१, देऊळगाव राजा १९, सिंदखेडराजा ३०, मेहकर मधील ५०, लोणार ४१, खामगाव १८, शेगाव १०, जळगाव जामोद १९, संग्रामपूर २२, मलकापूर व नांदूरयातील प्रत्येकी १४, तर मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या सोडत काढण्यासाठी ३ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. ६ तारखेला १३ तहसीलदारानी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात येणार आहे. ७ तारखेला प्रभागनिहाय आरक्षणचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आल्यावर ,७ ते १० जून दरम्यान यावर हरकती व सूचना दाखल करता येतील. यावर एसडीओ १५ तारखेपर्यंत हरकती लक्षात घेऊन अभिप्राय देतील. हे अभिप्राय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस मान्यता देणार आहे. अंतिम प्रभाग रचना ( नमुना अ ) २० जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Previous articleधामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !
Next articleकाँग्रेसचे शिर्डी येथे 2 दिवशीय नवसंकल्प कार्यशाळा। जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ही राहणार उपस्थित.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here