Home अकोला दि. 20 जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहिम नदी काठी येण्याचे जिल्हाधिकारी...

दि. 20 जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहिम नदी काठी येण्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आवाहन  सकाळी 8.00 वाजता होणार स्वच्छतेला प्रारंभ  शांततेत स्वच्छता करण्याचे आवाहन

128
0

राजेंद्र पाटील राऊत

दि. 20 जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहिम
नदी काठी येण्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आवाहन

सकाळी 8.00 वाजता होणार स्वच्छतेला प्रारंभ
शांततेत स्वच्छता करण्याचे आवाहन

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : मागील दि. 13 जानेवारी रोजी मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आली. मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार असल्याने शनिवार, दि. 20 जानेवारीला सकाळी ठिक 8.00 वाजता नदी काठच्या निमवाडी येथील लक्झरी बस स्टँडच्या परिसरात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे
अकोल्याचे वैभव असणारी मोर्णा नदी जलकुंभी व कचऱ्याने विद्रुप झाल्याने तिच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्याचे निश्चित केल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, शिक्षक, विदयार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करण्याचे ठरविले. दि. 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह 7 हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होऊन नदीच्या स्वच्छतेत सहभाग घेतला. मोहिमेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या मोहिमेमुळे नदीचे रुप पालटून गेले असून नदी आता खळाळून वाहताना दिसत आहे.
मात्र नदीची स्वच्छता अदयाप बाकी असल्याने दि. 20 जानेवारी रोजी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वच्छता मोहिमेकरीता योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. नदी पूर्णत: स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा व मनपा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. कोणालाही दुखापत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणालाही प्रत्यक्ष नदीच्या आत जाऊन स्वच्छता करावी लागणार नाही, त्यासाठी अनुभवी कामगारांचे साहय घेतले जाणार आहे. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने व शांततेने स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here