Home माझं गाव माझं गा-हाणं रानवड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा रविवारी होणार शुभारंभ; शरद पवार यांच्या हस्ते...

रानवड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा रविवारी होणार शुभारंभ; शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

288
0

राजेंद्र पाटील राऊत

रानवड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा रविवारी होणार शुभारंभ; शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
निफाड- सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अशी की; गेल्या सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला निफाड सहकारी साखर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जनतेला दिला आणि दिलेल्या शब्द पाळत आमदार दिलीप बनकर यांच्या यशस्वी पाठपुराव्याने आमदार बनकर यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत असलेली स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेला पुढील १५ वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला, २४ जून २०२१ रोजी करारनामा पूर्ण करत आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने रात्रीचा दिवस एक करत फक्त ५ महिन्यात कारखान्याचा चालू हंगाम सूरु करण्याची तयारी पूर्ण केली असून ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे शुभहस्ते तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर नाशिक जिल्ह्यातील आजी माजी, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार असल्याची माहिती स्व अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा चेअरमन गफ्फार शेख, कार्यकारी संचालक अरविंद जाधव, जनसंपर्क संचालक, गणेश बनकर व संचालक मंडळ यांनी दिली आहे. निफाड तालुक्यातील नागरिक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षण असल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचेही आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.खरे तर ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here