राजेंद्र पाटील राऊत
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच वंचित बहुजन आघाडी बागलाणचा तहसिलवर ऐतिहासिक ‘तिरडी मोर्चा”.
सटाणा — शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटली मात्र संविधानाने बहाल केलेल्या मुलभूत अधिकारांपासून आजही आदिवासी (भिल्ल) समाज वंचित राहिलेला दिसून येतो.
प्रतिष्ठापूर्वक जगणे तर सोडाच पण ; मेल्यानंतर प्रेताचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणेकामी गावागावात दफनभूमीची व्यवस्थाही मिळत नाही. त्यामूळे कुठेतरी नदीकाठी, गलिच्छजागी श्रद्धा-उपासना-भावना पायदळी तुडवत या समाजातील मृतांचा अंतिम संस्कार करावा लागतो.
वास्तविक शासनाने या विषयाकडे गांभिर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक होते.मात्र आजपर्यंतच्या कोणत्याही शासनाने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने बघितले नाही. देश स्वतंत्र झाला मात्र या देशात आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक आहे काय ? आम्हाला मरणानंतरही शासन जागा देऊ शकत नाही काय ? आमच्या मुलभूत अधिकारांचे काय ? या आणि अशा महत्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर हा ‘तिरडी मोर्चा’ शहरातील मंगल नगर पासून सुरुवात करून तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व माजी तालुकाध्यक्ष चेतन वनिस यांनी केले. तहसील कार्यालयाच्या आवारात सांगता करत तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रवक्ते प्रा.अमोल बच्छाव, माजी तालुकाध्यक्ष चेतन वनिस , गोरख चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादासाहेब खरे, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार,उपाध्यक्ष दीपक पाटील संघटक डॉ सिद्धार्थ जगताप, कडू वनिस, सचिव राहुल येशी, दीपक बच्छाव, दत्ता पाटील, ऋतिक गायकवाड,साजन गायकवाड, स्वप्नील बच्छाव, राहुल बच्छाव, मुन्ना शिरसाठ, अतुल शेजवळ,अंकुश बच्छाव, नागेश शेजवळ, गोरख चव्हाण, शिवा चौरे, विजय पवार, आकाश माळी, सागर माळी, संजय गवळी, प्रदीप माळी, सुधाकर पवार, सुरेश सोनवणे, कृष्णा वाघ, अनिल मोरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.