आशाताई बच्छाव
EXCLUSIVE बाप रे बाप! महिलेच्या गर्भाशयातून काढला साडेतीन किलोचा गोळा..! बुलडाण्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा एक महिला कित्येक दिवसांपासून तीव्र पोटदुखीने त्रस्त होती. विविध ठिकाणी उपचार घेऊनही काहीही फरक न पडल्याने शेवटी तिला मोठ्या शहरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, या महिलेसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय बुलडाणा हेच आशेचं
केंद्र ठरलंय… दि. १ मे रोजी सदर महिला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाली. सोनोग्राफीच्या तपासणीत तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तत्काळ निर्णय घेत, दि. ३ मे रोजी शस्त्रक्रियेद्वारे तिच्या पोटातून तब्बल ३५०० ग्रॅम (३.५ किलो) वजनाचा गर्भाशयातील गाठीचा मासाचा गोळा यशस्वीपणे काढण्यात आला.
या जटिल आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली.
ही शस्त्रक्रिया स्त्रीरोग तज्ञ डॉ. संतोष वानखेडे, डॉ. संजीवनी वानरे, भूलतज्ञ डॉ. प्रियांका मोरे पाटील, आणि डॉ. अभिश्री, तसेच परिचारिका मनिषा राठोड व सुनीता मंजुळ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली. शस्त्रक्रियेकरिता सहाय्यक म्हणून सूरज हिवाळे, आशिष आव्हाड, शुभम आदे आणि सोनाली गवई यांचेही मोलाचे योगदान लाभले. या यशस्वी उपचारप्रक्रियेचे मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, अधिष्ठाता डॉ. कैलास झीने, आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. सदर गोळा प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आला असून रुग्ण सध्या सुरक्षित असून तिची प्रकृती सुधारत आहे. बुलडाण्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात यशस्वीपणे पार पडलेली ही शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी एक आशादायक आणि कौतुकास्पद उदाहरण ठरली आहे.