आशाताई बच्छाव
केशवनगर येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते मनपा शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न…
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मनपा शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा शुभारंभ चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय श्री शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते अत्यंत आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मूलभूत पाया आहे. केशवनगर परिसरात नव्या शाळेच्या इमारतीची उभारणी केवळ शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देणे नाही, तर भविष्यातील पिढीला सक्षम, सुसंस्कारित आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने घेतलेले ठोस पाऊल आहे. आणि या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होतील, यावर मला पूर्ण विश्वास आहे असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. नामदेव ढाके, मा.महापौर सौ.अपर्णाताई डोके, मा.नगरसेवक श्री. सुरेश भोईर, श्री. राजेंद्र गावडे, श्री. अभिषेक बारणे, श्री. मोरेश्वर शेडगे, श्री. संतोष कांबळे, नगरसेविका श्रीमती अश्विनीताई चिंचवडे, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. अपर्णाताई डोके, मुख्य शहर अभियंता श्री. मकरंद निकम, श्री. देवना गटुवार, श्री. सूर्यवंशी साहेब, श्री. अंधुरे साहेब, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग सौ. बांगर मॅडम, विद्युत विभाग श्री. देशमुख साहेब, सौ. पवार मॅडम, भाजपा उपाध्यक्ष श्री. रविंद्र देशपांडे, श्री. रविंद्र प्रभुणे, स्विकृत नगरसेवक श्री. विठ्ठल भोईर, श्री. बिभीषण चौधरी, श्री. शेखर चिंचवडे, श्री.संजय जगताप, श्री. गतिराम भोईर, चिटणीस श्री. मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष श्री. हर्षद नढे, श्री. सोमनाथ तापकीर, श्री. गणेश ढोरे, श्री. सनी बारणे, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. दिपाली कलापुरे, सौ. नुतनताई चव्हाण, सौ. पल्लवीताई पाठक, सौ. चैतालीताई भोईर, श्री. सुरेश हगवणे, श्री. माधव पाटील, श्री. शैलेंद्र गावडे, श्री. सुरज भोईर, श्री. शिवाजी पाटील व त्याच बरोबर
महापालिकेचे पदाधिकारी, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.