Home कोल्हापूर सकल हिंदू समाज तर्फे जाहीर निषेध आंदोलन उत्स्फूर्ततेने पार पडले!

सकल हिंदू समाज तर्फे जाहीर निषेध आंदोलन उत्स्फूर्ततेने पार पडले!

34
0

आशाताई बच्छाव

1001451578.jpg

सकल हिंदू समाज तर्फे
जाहीर निषेध आंदोलन उत्स्फूर्ततेने पार पडले!            कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ 

आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.

या आंदोलनाला कोणतेही औपचारिक निमंत्रण न देता, फक्त समाजमाध्यमांद्वारे आणि मना-मनातील संतापाच्या लाटेने असंख्य हिंदू बांधवांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला. हातात भगवे ध्वज, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि राष्ट्रभक्तीने भारलेली हवा, हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी होते.

प्रत्येक हिंदूच्या मनातील रोष आणि संघर्षाची भावना प्रकट करताना, २०x४० फूट आकाराचा पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांच्या प्रतिमा जमलेल्या हिंदू बांधवांनी पायाखाली तुडवत जाळल्या. “हिंदू शांत असतो, पण जागा झाला की रणभेरी वाजवतो!” या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या हिंदू समाजाने ठाम संदेश दिला आहे की धर्मद्रोही, हिंदूद्वेष्टा आणि देशद्रोही यांना हिंदू समाज कधीही माफ करणार नाही.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व भगिनी-बंधूंना, तरुणांना आणि ज्येष्ठांना मनःपूर्वक धन्यवाद!

सकल हिंदू समाजाचे पुढील सदस्य उपस्थित होते.
गजानन तोडकर, उदय भोसले, अभिजीत पाटील, निरंजन शिंदे, योगेश केळकर, सुजित चव्हाण, महेश जाधव, विकास जाधव, किशोर घाटगे, प्रसन्न शिंदे, आनंदराव पवळ, मनोहर सोरप, उमेश नरके, अर्जुन आंबे विकी जरग, शिवानंद स्वामी, अमय भालकर, नंदू घोरपडे, अश्विनी घोपुडगे, रामभाऊ मेथे, तेजस्विनी पार्टी, बाबा पार्टी, निलेश हंकारे, बंडा साळुंखे, नाना कदम, अमर जाधव, दिलीप गायकवाड, गायत्री राऊत, राजू तोरस्कर, शीला माने, अनिल दिंडे, पांडू पाटील, आर डी पाटील, रोहित खराडे, विनायक माने, संतोष लाड, शंतनु मोहिते,

त्याचप्रमाणे विविध संघटनांचे प्रमुख तसेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleअखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालय द्वारे जाहीर निषेध आंदोलन
Next articleअजंदे परिसरात जंगलाला आग; ताहराबाद वनविभागाच्या धाडसी प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here