आशाताई बच्छाव
पत्रकाराच्या लेखणीला धार असेल तर चांगल्या चांगल्यांना घाम फोडतो -विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे
दैनिक माझा मराठवाडा तिसऱ्या वर्धापनदिनी ( सिल्लोड) छत्रपती संभाजीनगर येथे मार्गदर्शन
छत्रपती संभाजी नगर( सिल्लोड) पत्रकाराच्या लेखणीला धारदार धार असेल तर तो पत्रकार चांगल्या चांगल्या राजकारण्यांना घाम फोडू शकतो. ज्याप्रमाणे कुंभार आपला मातीचा माठ तयार करताना ज्याप्रमाणे त्याला आकार देतो त्याचप्रमाणे पत्रकाराने आपल्या लेखणीच्या योग्य वापर केला तर चांगल्या चांगल्या राज्यकारण्यांना घाम फोडू शकतो.पत्रकारांचा वापर राजकारण्यांच्या प्रसिद्धीसाठी फक्त केल्या जातो. परंतु पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत मानधनाचा प्रश्न ,घरकुलच्या प्रश्न ,अधिकृत पत्रकारितेच्या दर्जा, विविध अशासकीय समित्या, याबाबत आमदार ,खासदार, मंत्री आवाज उठवताना दिसत नाही. मात्र आपल्या सुविधा बरोबर ते करून घेतात .याकरिता त्यांना कोणतेही आंदोलन करावे लागत नाही. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना कोणताही सन्मानाचा दर्जा नाही. या पत्रकारितेच्या भरोशावर त्यांना सन्मान मिळाला ,मोठे मोठे पदावर गेले ,परंतु त्या पत्रकारांची जाणीव यांना नाही. ते आज दिनांक 27 एप्रिल दुपारी 12 वाजता दैनिक माझा मराठवाडा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिल्लोड येथील एमटीडीसी जळगाव रोड सभागृहात पत्रकार संजीव भांबोरे विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर उपाध्यक्ष संजय कुलकर्णी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समर्थ प्रतिष्ठानचे सचिन इंगळे, दैनिक गरुड झेप चे मुख्य संपादक जीटी वाघ तिरंगी न्यायालय चे संपादक दादासाहेब काळे, संजय देवकर, , अशोक सोनवणे सामाजिक कार्यकर्ता, सुदर्शन चॅनलचे राठोड, सरपंच विलास मनगटे, रघुनाथ घरमोडे शिवसेना तालुकाप्रमुख सिल्लोड, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व प्रॉब्लेम लोकराज्य छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे पुरस्कार ते छत्रपती शाहू महाराज व संविधानाचे निर्माते बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्व पाहुणे मंडळींनी आपले विचार विचारमंचावरून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी केले. तर आभार प्रवीण तायडे वृत्तसंपादक दैनिक माझा मराठवाडा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संजय दांडगे कार्यकारी संपादक दैनिक माझा मराठवाडा, मुजिक खान सहसंपादक, गोकुळ सिंग राजपूत मराठवाडा विभागीय संपादक ,जितेंद्र भवरे सहसंपादक, जमील मिर्झा उपसंपादक, सतीश लोखंडे, सुधाकर सिंगारे व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पत्रकार व पत्रकार भगिनींनी सहकार्य केले.