आशाताई बच्छाव
शेलुद येथे अवैध दारू भट्टी उध्वस्त 66 हजाराचा मुद्देमाल जप्त पारध पोलीसाची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील शेलुद परिसरात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गावठी दारू भट्टी उध्वस्त केले या कारवाई पारध पोलिसांनी 460 लिटर गावठी दारू बनविण्यासाठी तयार केलेले मिश्रण दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पारध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पारध पोलीस ठाण्याची पोलीस कर्मचारी शेलुद धरणाच्या बाजूला गस्त घालत असताना त्यांना संशयित ठिकाणी काही हालचाल दिसली अधिक तपास केला असता धरणाच्या कडेला एका ठिकाणी दोन प्लास्टिकच्या ड्रम मध्ये प्रत्येकी दोनशे लिटर आंबट आणि उग्रस् वास असलेली गावठी दारू बनवण्याचे मिश्रण आढळून आले तसेच एका काळया रंगाच्या लोखंडी ड्रम मध्ये 200 लिटर मिश्रण आणि भट्टी साठी लागणारे साहित्य देखील मिळून आले या सर्व साहित्याची किंमत सुमारे 66 हजार रुपये आहे पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून इकबाल हुसेन तडवी शेलुद या नावाचा आरोपी पळून गेला या प्रकरणी जीवन रमेश भालके पोलीस कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सपोनी संतोष माने यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश शंकर करीत आहेत.
पोलीसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीसांनी अशीच कामगिरी सतत चालू ठेवल्यास अवैध धंद्यांना आळा बसेल असे मत नागरिकांमधून व्यक्त होतांना पहावयास मिळत आहे.