आशाताई बच्छाव
सौंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील जातीयवादी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय ततारवर तातडीने कारवाईची मागणी:पानपाटील
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:- तालुक्यातील सौंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय ततार हे कर्मचाऱ्यांना जातीयवादी वागणूक देऊन त्यांचा अमानुष छळ करीत असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते एम.सी.पानपाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
पानपाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सौंदाणे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय ततार हे मनमानी करुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीयवादी वागणूक देऊन त्यांचा अमानुष छळ करीत आहेत.आरोग्य केंद्रातील कर्मचारी श्री के.के.ठाकूर (आरोग्य सहाय्यक) व श्रीमती ए.एल.आढाव (आरोग्य सहाय्यिका) यांना कर्मचाऱ्यां समक्ष एकेरी भाषेत बोलून “तुमचे थोबाड फोडून काढेन” तुम्ही स्वतः च स्वेच्छा निवृत्ती घेऊन नोकरी सोडा,मी कुणालाच घाबरत नाही.तुम्हाला जेथे जायचे तेथे जा..अशी बेताल स्वरुपाची उतरे कर्मचाऱ्यांना देऊन जातीयवाद करणा-या डॉ अक्षय ततारने या दोन्ही कर्मचाऱ्यांची विविध शासकीय बिले अडवून ठेवली आणि ते बिले मंजूर करून देण्यासाठी पैशाची मागणी केली.
दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे व्यथित झालेल्या वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी कास्ट्राईब संघटनेचे नेते पानपाटील यांचेकडे लेखी तक्रार देऊन न्यायाची मागणी केली असता संघटनेचे नेते पानपाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देऊन तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.वेळेत याप्रकरणी न्याय न मिळाल्यास व डॉ अक्षय ततारवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
तर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना आपला संपूर्ण पाठिंबा असून,प्रसंगी त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील बापू देशमुख यांनी दिला आहे.