आशाताई बच्छाव
कोसगाव येथील शेतकऱ्याची एक गाय व एक बैल गेले चोरीस
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथिल शेतकरी दशरथ विठ्ठल शिंदे यांचा एक बैल व गाय शनिवारी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री चोरीस गेल्याची घडली आहे. कोणाला आढळल्यास दशरथ शिंदे 7020252669/9545128961यांच्या फोन नंबर वर संपर्क साधावा अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.
पेरणीचे दिवस जवळ आलेले असताना शेतकऱ्यावर असे संकट आल्या मुळे दशरथ शिंदे हतबल झाले आहे. जर तपास नाही लागला तर तहसिलदार साहेबांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी कोसगाव येथील शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.