आशाताई बच्छाव
दापोडी येथील पोलीस स्थानकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले
पुणे प्रतिनिधी – राकेश बेहेरे पाटील
दापोडी पोलीस स्टेशनचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या दापोडी येथील पोलीस ठाण्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार अमित गोरखे माजी आमदार विलास लांडे महापालिका आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त सचिन हिरे दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पोलीस निरीक्षक वंदना ठोक व इत्यादी पोलीस कर्मचारी, संजय काटे योगेश बहल नाना काटे प्रशांत शितोळे राजेंद्र जगताप राजू बनसोडे, रोहित काटे चंद्रकांता सोनकांबळे माई काटे यावेळी उपस्थित होते दापोडी पोलीस स्टेशन नवीन इमारतीची वैशिष्ट्ये आत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज महापालिकेच्या लाईट हाऊस प्रकल्पाची ही इमारत असून त्यातील काही भाग पोलीस ठाण्यासाठी दिले आहे इतरसर्व सोयी सुविधांनी या ठिकाणी मोकळे मैदान व गार्डन परिसर आहे प्रशस्त डे बुक मुद्देमाल कारकून तपास पथक पुरुष विश्रांती कक्ष महिला विश्रांती कक्ष बाल स्रेही कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारला आहे