
आशाताई बच्छाव
राहुरीत शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : मंत्री विखे पाटील अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राहुरी येथील घटनेनंतर विखे पाटील यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. राहुरी येथील घटनेचा तपास पोलीस योग्यदिशेने करीत आहेत. त्यांना थोडा कालावधी अजून द्यावा लागेल. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आपणही तीव्र शब्दात निषेध करतो, असे ते म्हणाले.