आशाताई बच्छाव
बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाला शाक्केधीता बौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून 1, 78,920 रुपये दान बोधगया येथे भदंत आकाश लामा यांच्याकडे सुपूर्त
संजीव भांबोरे
नागपूर-बोध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला अधिक गती मिळावी याकरिता शाक्केबौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून 1 लाख 78 हजार 920 रुपये आंदोलनाकरिता बोधगया येथे येथे भदंत आकाश लामा यांना आज दिनांक 21 मार्च 2025 ला बोधगया येथे देण्यात आले. यावेळी धम्मदिना ,भिक्षु संघ तसेच महिला मंडळाच्या तक्षशिला वाघधरे, सुचिता बुरबुरे , ज्योती आवळे,प्रमिला सरस्वती , अय्याजी मत्तेचिता , व सर्व बौद्ध उपासक व उपासीका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दान दिल्याबद्दल भिक्षू संघांनी आभार व्यक्त केले.