आशाताई बच्छाव
उदगीर शहरातील भगीरथ राजा नगर भागातील रस्त्यानालीचे बांधकाम रखडले !
न.प.चा विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ?.
उदगीर लातुर / प्रतिनिधी
उदगीर नगर पालिकेच्या भगीरथ राजा नगर जळकोट रोड सह शहरालगतच्या मुळ व हद्दवाढ क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांतर्गत रस्ते व नाल्या या मुलभुत सुविधांची कामे केली जात आहेत. परंतु स्थानिक अतिक्रमण हा मुद्दा समोर करून विकास कामांत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचा कांगावा करत. यात सामान्य नागरिकांना डावलून अतिक्रमणधारकांना न्याय देण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याचे दिसत आहे. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून व गेले अनेक दिवसांपासून उदगीर शहरातील ३३ प्रभागातील व शहरालगतच्या, शहरातील भगीरथ राजा नगर, गोविंदशेशी शिंदे नगर निवास, धोंड कॉलनी, कमलेश्वर प्राथमिक व माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय कॉलेज रोड भगीरथ नगर जळकोट रोड उदगीर, बौद्ध सोसायटी, शिवनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, छत्रपती धर्मवीर संभाजी राजा नगर, म्हाडा कॉलनी भागातील रस्ते व नालीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे नगरपरिषद उदगीरच्या हद्दीतील व हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे मर्जीतील या जवळच्या नातेवाईकांच्या मजूर सहकारी संस्थेवर व सुशिक्षित बेकार अभियंता, शासकीय, निम शासकीय ठेकेदार, कंत्राटदार, गुत्तेदारांच्या नावावर घेऊन प्रत्यक्षात माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी खासदार, आमदार तसेच त्यांच्या जवळचे बगलबच्चे, नातेवाईक आणि गुंडप्रवृत्तीचे, विविध पोलीस स्थानकात, स्टेशनला नोंद असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड प्रवर्तीचे लोक हे शासकीय, निमशासकीय ठेकेदार, मजूर सहकारी संस्था गुत्तेदार, सुशिक्षित बेकार अभियंता, ठेकेदारांच्या नावावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, उपविभागाकडून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून, उपविभागाकडून, जिल्हा नियोजन कार्यालयाकडून, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलनिसारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद बांधकाम विभागातून प्रशासकीय अध्यक्ष, मुख्याधिकारी, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर, जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयाकडून विविध नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था, ठेकेदार, कंत्राटदार, बांधकाम व्यवसायिक कंत्राटदार, सुशिक्षित बेकार अभियंता नोंदणीकृत ठेकेदारांच्या नावावर एक टक्का कमिशन देऊन नावावर कामे घेतले जातात. ही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता अर्धवट सोडून दिले जात आहे. विशेष म्हणजे उपरोक्त करण्यात येणारी कामे हे निकृष्ट दर्जाचे, दर्जाहीन आहेत. सदरील रस्ता व नाली कामे, बांधकामे अंदाजपत्रका प्रमाणे न करता थांतूर- मांतूर व निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत. त्यांचं दर्जा सुमार आहे. सदरील कामे प्रभागात व वार्डात सुरू असताना या निमशासकीय, शासकीय ठेकेदार, गुत्तेदारांवर लक्ष ठेवण्याकरिता नगरपरिषदेचा नगर अभियंता, शाखा अभियंता, अधिकारी व कर्मचारी एकदाही येत नाही हे पण विशेष आहे. हे न उलगडणारे गौडबंगल आहे. याबाबतीत तक्रार करणाऱ्यांना धमकी वजा जीवे मारण्याची, हातपाय तोडण्याची, उदगीर शहरात जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली जाते.
विकास की, अर्थ विकास हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील गावे, वाडी, तांडा, वस्ती व शहरातील प्रभागातील, वार्डातील कामे कोवीड-१९ तथा कोरोना काळानंतर एकदाही नगरपरिषदेच्या वतीने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने, जलसंधारण विभागाच्या वतीने नळ योजना, पाणीपुरवठा योजना, रस्ते, नाली, पेव्हर ब्लॉक, मूलभूत गरजा, दळणवळणाची तसेच इतर कामे नवीन रस्ते निर्मिती व बांधकामे, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते, नवीन नाली बांधकाम, नवीन मूलभूत रस्ते, नाली, नळयोजना व्यवस्थित केले गेले नाहीत. यामुळे परिसरात घाण साचत असून, या घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. या संदर्भात स्थानिकानी व ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी न.प.मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी लातूर तथा अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषद व सचिव ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर, अधीक्षक अभियंता औरंगाबाद, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, राज्याचे मुख्य सचिव मंत्रालय मुंबई सह विविध खात्यांचे मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, सचिव, उपसचिव, विभागीय आयुक्त यांना निवेदन लातूर जिल्ह्यातील उदगीर, जळकोट मतदार संघात मूलभूत सुविधेसह इतर कामे त्वरित करण्यात यावी, तसेच जळकोट रोड स्थित नगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील भगीरथ राजा नगर येथे नवीन नाली बांधकामे व नवीन रस्ते देण्यात यावी, ही कामे त्वरित प्रारंभ करण्यात यावीत अशी मागणी केली. अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवाशी म्हणून करण्यात येत होती. या मागणीला यश आल्यानंतर ही कामे एका नोंदणीकृत कंत्राटदार, मजूर सहकारी संस्था, ठेकेदाराला देऊन खोदकाम केलेल्या नाल्याचे बांधकाम पूर्ण करावे, ही मागणी केली. परंतु संबंधीत अधिकारी गेल्या काही दिवसांपासून हजर नसल्याने हे काम रखडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विकास कामांतून खरोखर शहराचा विकास की, अर्थ विकास हा प्रश्न उपस्थित होत आहे. रखडलेल्या कामांमुळे एखादवेळी अपघात घडल्यास अथवा आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असे जळकोट रोड भगीरथ राजा नगर, गोविंदशेशी नगर निवास, शिवनगर, म्हाडा कॉलनी, बौद्ध सोसायटी, गौतम नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर, आझाद नगर, शिवशक्ती नगर, विकास नगर, अशोक नगर, देगलूर रोड, नांदेड-बिदर रोड, डॅम रोड, बनशेळकी रोड, बिदर रोड, देगलूर रोड, जळकोट रोड, नळेगाव-लातूर रोड, मलकापूर नवीन वस्ती, निडेबन नवीन वस्ती, गल्ली परिसरातील रहिवाशांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.