आशाताई बच्छाव
भरारी आरोग्यवर्धिनी संस्था गडचिरोली यांच्या वतीने डॉ.कोहळे हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
90 हुन अधिक जणांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: भरारी आरोग्यवर्धिनी संस्था गडचिरोली च्या वतीने शहरातील डॉ. कोहळे हॉस्पिटल हनुमान वार्ड गडचिरोली येथे सुप्रसिद्ध डॉ.प्रवीण खरवडे स्ञीरोग तज्ञ नागपूर यांच्या कडून 90 हून अधिक रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
भरारी आरोग्यवर्धिनी संस्था सर्वसामान्यांना निस्वार्थपणे सेवा देणारे आरोग्य मंदिर ठरले आहे, इतर मोठ्या हॉस्पिटल मध्ये खर्चिक आरोग्य तपासणी सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही , संस्थेने नेहमी सेवाभाव जपली असून, मानवतेच्या या कार्यास नेहमीच योगदान राहाणार असे प्रतिपादन संस्थेचे कर्मचाऱ्यांनी केला.
या शिबीरात सुप्रसिद्ध डॉ प्रवीण खरवडे स्ञीरोग तज्ञ नागपूर यांच्या कडून 90 हून अधिक जणांची स्ञीरोग संबंधि मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले , 90 रुग्णा मधून ज्यांचे स्ञीरोग संबंधित शस्त्रक्रिया करिता 4 रूग्ण निघाले त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून मोफत शस्त्रक्रिया करून देण्याबाबत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिले.
तसेच 3 रूग्ण कॅन्सरची शक्यता असल्याने त्यांचे रक्त तपासणी करिता पाठविण्यात आले , व रूग्णांची रक्त चाचणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
भरारी आरोग्यवर्धिनी संस्था सामाजिक व धार्मिक कार्यास सक्रिय योगदान देत आहे अंतिम घटकापर्यंत रूग्णसेवा पोचवण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सूरू असून या सेवाकार्यात कर्मचारी,डॉक्टर, नर्स, यांचे नेहमीच योगदान मिळत आहे.शिबिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून गरजू घटकांना आधार देण्यात येत आहे. पैशापेक्षा सेवाभाव वृत्तीने कार्य सूरू असून विविध शिबीराच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.
या शिबीरास डॉ.शिल्पा कोहळे, डॉ. कापगते,डॉ.आटमांडे,डॉ.के.कोहळे, सौ. शायली पोटवार, डॉ.मनिषा गेडाम,सोनाली ताई बिजवे, कविता धाइत,उमा देवाईकर , संतोष करपे, स्नेहल संतोषवार, कुंदन, स्वप्निल चापले ,मंगेश ,अबोल या सर्वांनी शिबिर योग्यरीत्या यशस्वी करण्यात यश प्राप्त झाले.