Home सामाजिक शेतमजूराचा मुलगा ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी अशोक त्र्यंबक शेवाळे

शेतमजूराचा मुलगा ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी अशोक त्र्यंबक शेवाळे

205
0

आशाताई बच्छाव

1001345781.jpg

शेतमजूराचा मुलगा ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी अशोक त्र्यंबक शेवाळे
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:- एखाद्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा व त्यापासून प्रेरणा घेऊन शुन्यातून विश्व निर्माण करण्याची इच्छाशक्ती निर्माण व्हावी अशी उदाहरणे आता फक्त अपवादात्मक स्वरूपात बघावयास मिळतात.घरची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना सुद्धा,या सगळ्या गोष्टींवर मात करीत नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका साधारण शेतमजूराचा असलेला मुलगा “अशोक”याने आपल्या गाव व परिसराचे नाव आज मोठे केले आहे.असे म्हटले तर वावगे काहीच ठरू नये.”अशोक” यांचे वडील त्र्यंबक शेवाळे हे एक शेतमजूर म्हणून काम करीत होते.डोंगराळे गावातील एका वाणी समाजातील शेतकऱ्यांकडे सालदार म्हणून त्यांनी काबाडकष्ट केलेत.ही परिस्थिती आपल्या मुलावर “अशोक”वर येऊ नये, म्हणून त्र्यंबक शेवाळे अतोनात कष्ट परिश्रम करीत राहिलेत.मुलगा अशोक यांचे प्राथमिक शिक्षण डोंगराळे ता.मालेगाव येथे झाले तर उर्वरित शिक्षण मालेगाव शहरात पार पडले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अशोक शेवाळे यांनी कुटूबांला आर्थिक हातभार लागावा म्हणून डोंगराळे येथील ग्रामपंचायतीत वसुली क्लार्क म्हणून सुमारे अकरा वर्षे सेवा केली.पुढे शासनाच्या ध्येय धोरणानुसार अशोक शेवाळे यांना दहा टक्क्यांतून ग्रामसेवक पदांची नोकरी मिळाली.पहिलीच नेमणूक त्यांची भारदेनगर, घाणेगाव गावांसाठी झाली.तेव्हापासून आजतागायत अशोक शेवाळे हे इमाने इतबारे आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहून ग्रामसेवा करीत आहेत.मुळातच मृदूभाषी असलेले व सतत हसतमुख असणारे अशोक शेवाळे सहजपणे कुणाच्याही मनात घर करून जातात अशा या सगळयांच्या प्रिय असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी अशोक शेवाळे यांना काल ( शनिवार दिनांक २२ मार्च) रोजी अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा शासनाच्या वतीने बहाल करण्यात येणारा नाशिक जिल्हा परिषदेचा “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार” सन २०२२-२०२३ सालातील उत्कृष्ट कर्तबगारीसाठी नाशिकमध्ये एका शानदार सोहळ्यात मान्यवर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला.माणसाने अंगी जिद्द ठेवली व आपल्या कामाप्रती एकनिष्ठता व इमानदारी ठेवली तर अशक्य असे काहीच नसते हेच अशोक शेवाळे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने सिध्द करून दाखविले आहे.आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान -मरातब ठेऊन सगळ्यांशी आदराने व आपुलकीने वागणा-या अशोक शेवाळेचा हा पुरस्काररुपी सन्मान म्हणजे खरे अर्थाने मजूरवर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.आपल्याला मिळालेला हा पुरस्कार अशोक शेवाळे यांनी आपल्या मातोश्री कोकीळाबाई यांच्या चरणीं समर्पित केल्याची भावना बोलून दाखवली आहे.अत्यंत गरिबीत व हलाखीच्या परिस्थितीत आपल्याला आईने शिकवून मोठे केले व आजच्या पुरस्कारांची खरी मानकरी आपली आईच असल्याचे शेवाळे सांगतात.ग्रामपंचायत अधिकारी अशोक शेवाळे यांच्या खडतर व संघर्षमय वाटचालीसाठी युवा मराठा न्यूज नेटवर्क महाराष्ट्र परिवाराचा मानाचा सलाम! व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभकामना…

Previous articleमहात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे
Next articleसंत रामपाल जी महाराज यांचा सत्संग समारोह संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here