आशाताई बच्छाव
अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक
पटकावला : १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला
बदनापूर/ जालना दि. २२(दिलीप बोंडे ब्युरो चीफ.)-निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित,
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर येथील बी फार्मसी
द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अंकित राठोड याने छत्रपती संभाजीनगर येथील
श्रेयस फार्मसी महाविद्यालयाद्वारे आयोजीत लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये
स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तसेच खालील अन्य १५ विद्यार्थ्यांनी
सक्रिय सहभाग नोंदवला.
यात कार्तिक बिडे, कुणाल जाधव, भाऊसाहेब गोटे, युवराज जायभाये, राजश्री
कांबळे, नेहा चव्हाण, वरद वाघ, सिद्धार्थ चाळगे, योगेश उर्कडे, सुशील
गाडेकर, प्रदीप खरात,विजय शेळके,रोहिणी रक्ताटे,प्रतीक हांडके, अनिकेत
रामदासी आदींना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे अमूल्य मार्गदर्शन
लाभले. मार्गदर्शक प्रा. अविनाश हटकर, प्रा.अर्शद अन्सारी, प्रा. वैशाली
साळुंके, प्रा.कोमल जैस्वाल, प्रा.सौरभ बोंद्रे यांनी केले. या यशाबद्दल
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.डॉ. देवेश पाथ्रीकर
यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे प्रा.
डॉ.सुनील जयभाये,कल्याण देवकत्ते, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे
अभिनंदन केले आहे.
००००००००००००
फोटो ओळी…..
४- पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर येथील बी फार्मसी द्वितीय वर्षाचा
विद्यार्थी अंकित राठोड याने छत्रपती संभाजीनगर येथील श्रेयस फार्मसी
महाविद्यालयाद्वारे आयोजीत लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम
क्रमांक पटकावला. तसेच खालील अन्य १५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग
नोंदवला.