Home नांदेड माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी.

माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी.

59
0

आशाताई बच्छाव

1001335802.jpg

माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड (माहूर) दि. 19 मार्च : श्री रेणुकामाता मंदिरामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक धार्मिक तसेच वन पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या माहूरच्या विकासामध्ये कोणताही खोळंबा होता कामा नये. त्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे केले.

महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर येथे उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज दुपारी माहूर गडावर पोहचले होते. त्यांनी यावेळी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल वेळोवेळी करतांना स्थानिक नागरिकांचे म्हणणे लक्षात घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी विवेक कांडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, मंदिर विश्वस्त उपस्थित होते. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या, रस्त्याचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांची चर्चा केली.

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगड यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

Previous articleमोठी बातमी ! लोणारच्या ५ जणांचे मोठे कांड; “काळ्या जादुसाठी”पांढऱ्या कारमध्ये घेऊन गेले १० लाख रुपयांचा “हा” साप! छत्रपती संभाजीनगरात गेल्यावर….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here