आशाताई बच्छाव
गुत्ती ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन संपन्न
अतनूर लातूर / प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील गुत्ती ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ मीना यादव केंद्रे यांनी प्रास्तविक केले. त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे अजित पवार राष्ट्रवादीचे युवानेते यादव केंद्रे, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते गावातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आणि कामे करणाऱ्या तसेच अंगणवाडी कार्यकर्ती, कोविड काळात उत्कृष्ट असे कार्य करणाऱ्या आरोग्य पर्यवेशिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनिस, उपकेंद्रातील आरोग्य महिला कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचा उत्कृष्टरित्या गावाचा सांभाळ करणाऱ्या महिला सरपंच सौ.मीना यादव केंद्रे, महिला ग्रामपंचायत महिला सदस्यांसह मीना यादव केंद्रे सरपंच, गोविंद राठोड उपसरपंच, विजयकुमार भोसले ग्रामसेवक, व्यंकट मुंडे, ज्योती केंद्रे, अनुसया केंद्रे, धम्मबाई पवार, चंद्रभागामाई सूर्यवंशी, कल्पना मोरे इतर विविध कमिटीच्या महिलांचा, सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. युवानेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव केंद्रे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला.