आशाताई बच्छाव
प्रा. डॉ. बी आर कत्तुरवार यांची अमरावती विद्यापीठाच्या आर आर सी समितीवर नियुक्ती
देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे
देगलूर :-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्र व विभागप्रमुख प्रा. डॉ. बी.आर. कत्तुरवार यांची संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील आर. आर. सी. (रिसर्च अँड रिकगनायझेशन कमिटी) या समितीवर लोकप्रशासन विषयाचे तज्ञ म्हणून कुलगुरू महोदयानी नियुक्ती केली आहे.
प्रा. कत्तुरवार हे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या आरआरसी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे राज्यस्तरीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून याशिवाय मुंबई येथील चेतना स्वायत्त महाविद्यालय येथील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
अमरावती विद्यापीठाच्या आरआरसी समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल
येथील अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,
उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.