आशाताई बच्छाव
माजी उपसभापती प्रदीप वाघ यांना ” लोकनेता ” पुरस्कार ! पालघर :सौरभ कामडी
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील जनतेची अव्याहातपणे सेवा करणारे मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती तथा आदिवासी संघर्ष हक्क समितीचे संस्थापक, अध्यक्ष प्रदीप वाघ यांना नाशिक लोकमत समूहाकडून ” लोकनेता ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बी. बी. चांडक आणि वृत्तसंपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
राजकारण अन् समाजकारण या एकाच नाण्याचा दोन बाजू. या दोहोंची मोट बांधत समाजाच्या हितासाठी धडपडणारे प्रदीप वाघ पालघर जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावत असून समाजकंटाकाप्रती संवेदनशीलता, कठोर परिश्रम आणि वेळेच्या पल्याड जाऊन दिलेलं समर्पण ही सामाजिक भावनेतून असलेली जनसेवा नव्या पिढीसाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. याच कार्याला मिळालेली लोकमान्यता ही लोकनेता असल्याचे अधोरेखित करते. म्हणून या समजकारणाच्या गौरवास्पद कार्याला आणि महत्वपूर्ण योगदानाला लोकमत समूहातर्फे प्रदीप वाघ यांना सन्मानित करण्यात आले.
मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात जात- पात, धर्म बाजूला सारून लोकांप्रति प्रामाणिकपणे सामाजिक कार्य सुरु असून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचा आलेख उंचावत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करणे याच लोकनेत्याच्या गुणांचा कार्यगौरव व्हावा म्हणून लोकमत समूहातर्फे प्रदीप वाघ यांना लोकनेता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमतकडून मिळालेल्या हा बहुमान मी आदिवासी जनतेसाठी समर्पित करत असल्याचे प्रदीप वाघ यांनी सांगितले.
यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, लोकमत टाईम्सचे एडिटर रिकी मर्चंट, नाशिक व मुंबई विभाग लोकमतचे प्रतिनिधी प्रा. तुकाराम रोकडे वाकडपाड्याचे उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलीस पाटील विठ्ठल गोडे, संजय वाघ, जीवन वाघ, अभिनया वाघ ,सविता वाघ आदी उपस्थित होते.
अवघा सोशल मीडिया झाला ” प्रदीप वाघ ” मय..!
लोकमत समूहामार्फत मोखाड्याचे माजी सभापती यांना लोकनेता पुरस्कार मिळाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, सामान्य जनता आणि सोशल मीडियातील त्यांचा चाहतावर्ग व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय होऊन शुभेच्छा देता होता. त्यामुळे अवघा सोशल मीडिया झाला ” प्रदीप वाघ ” मय झाल्याचे चित्र दिसत होते.