आशाताई बच्छाव
श्रीरामपुर (दिपक कदम) शिवसेना उभाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात त्याचे तिव्र पडसाद उमटले येथील शिवसेनेच्या वतीने शिर्डी लोकसभा,माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख नितीन औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप वाघ तालुका प्रमुख,राजश्री होवाळ, यांच्यासह शिवसेनेच्या (शिंदे गट) असंख्य कार्यकर्त्यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.
डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेना उपनेते यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे,हे वक्तव्य म्हणजे केवळ नीलम गोऱ्हे नव्हे,तर संपूर्ण महिला भगिनींचा अपमान आहे,याच्या तीव्र निषेधार्थ शिवसेना वतीने श्रीरामपुर शहरात तीव्र निषेध जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी शुभम वाघ,जिल्हाप्रमुख युवासेना,उपजिल्हाप्रमुख शरद भणगे,राजेश तांबे उपजिल्हाप्रमुख,
विशाल शिरसाठ उपजिल्हाप्रमुख,युवासेना संदीप दातीर,तालुका प्रमुख युवासेना बाबासाहेब भालेराव,अनुसूचित जाती सेलचे तालुकाप्रमुख,शरद पवार ,लक्ष्मण पाचपिंड , उपतालुका प्रमुख,राहुल भंडारी, युवासेना शहरप्रमुख सत्तू महाराज,रवींद्र जाधव,देविदास सोनवणे,अण्णासाहेब कांदळकर,अजित कांदळकर, सविता वाडीले शहरप्रमुख महिला आघाडी,गोपाळे ताई,मोनाली जाधव,कविता वाघ,साधना प्रभू ,लता जगताप, कल्पना भोसले, गाडे ताई, शिवसेनेचे शहर व तालुका पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.विशाल रमेश शिरसाठ युवासेना उपजिल्हाप्रमुख आदी उपस्थित होते.