आशाताई बच्छाव
महाबोधी मुक्ती आंदोलना पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्वपक्षीय ७ मार्चला भव्य निदर्शने
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –बिहार येथील बुद्धगयातील भिकू संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बसपा पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित चळवळीतील सर्व पक्ष संघटना यांची सर्वपक्षीय मीटिंग संपन्न झाली त्यावेळी मीटिंगमध्ये सर्वानुमते शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रांतकार्यालयावर सर्व पक्षीयांच्या वतीने भव्य निदर्शने करणार असल्याची ठरले अशी माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिली त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की बिहार येथील बुद्ध गया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धाच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे नैसर्गिक न्याय ठरेल कारण हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मज्जिद मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात मग बौद्धांचे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही म्हणून इंग्रज काळातील 1949 चा महाबोधी महाविहारला लागू असलेला कायदा रद्द करून भारतीय संविधाना नुसार कायदा करून त्या कायद्या द्वारे ट्रस्ट स्थापन करून महाबोधी महाविहार सर्व ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी ७ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता प्रांतकार्यालयावर सर्वपक्षीय भव्य निदर्शने करण्यात येणार आहे तरी फुले शाहू आंबेडकर चळवळीत सर्व पक्ष संघटनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधरा इंगळे प्रकाश सावंत राष्ट्रवादीचे अशोक बागुल रिपाईचे सुनील शिरसाठ सुरेश जगताप राजू नाना गायकवाड मोहन आव्हाड मनोज काळे विशाल सुरडकर रॉकी लोंढे वंचित चे चरण त्रिभुवन सुनील वाघमारे बसपाचे सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे पीपल्स पार्टीचे संतोष मोकळ स्वराज्य संघटनेचे विजय खाजेकर गोरख आढाव भीम पॅंथरचेअमित काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष रवीअण्णा गायकवाड बौद्धाचार्य अण्णासाहेब झीने रमेश व्हसाळे आदींनी केले आहे