आशाताई बच्छाव
शिवैक्य चंद्रकलाबाई पाटील यांचा आज अभिवादनाचा कार्यक्रम !
मुखेड, प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील येवती येथील शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील
यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार, दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी अभिवादनाचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्वांनी आमच्या शेतातील म्हणजेच येवती येथील श्री खंडोबा मंदिर येथे सकाळी ठिक ११ : ०० वाजता या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नांदेडचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांनी केले आहे.
शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील यांचे दि. ३ मार्च २०२४ रोजी येवती येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले होते. ते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांच्या ते आई तर येवती येथील सरपंच डॉ.उमेश पाटील यांच्या ते आजी होत्या .
श्री. विश्वांभर धोंडीबाराव पाटील श्री. मनोहर धोंडीबाराव पाटील हे दोन्ही मुले आहेत. शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन व जेवणाचा कार्यक्रम दि. ३ मार्च २०२५ रोजी आमच्या शेतातील
श्री. खंडोबा मंदिरा समोर ठेवण्यात आला असून जेवणाची वेळ
सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० अशी राहिल तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांनी केले आहे.