आशाताई बच्छाव
सोनई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.. अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –काल मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग अंतर्गत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्यासारख्या थोर लेखक साहित्यिक आणि कविवर्य यांच्या योगदानामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने सर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे श्रेष्ठत्व व्यक्त केलं. तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ.संभाजी दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निवृत्ती सोनवणे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल निपुंगे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश साळवे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशासकिय अधिकारी डॉ. संदीप खेडकर,डॉ. अशोक तुवर, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ.सुरेश जाधव, डॉ. हरिश्चंद्र सडेकर प्रा. बाळासाहेब शिंदे, वीरेंद्र दरंदले यांच्या समवेत अनेक प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.