Home पुणे पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय

पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय

30
0

आशाताई बच्छाव

1001275826.jpg

सर्व एस.टी. बसेसमध्ये जी.पी.एस. आणि सी.सी.टी.व्ही. बसवण्याचे निर्देश”,

पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षिस जाही करण्यात आले आहे.

पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर एस.टी. प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून,
महिला प्रवाशांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालय येथे पार पडली.

या बैठकीनंतर महिला प्रवशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही. आणि जी.पी.एस. यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

आता सर्व बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही.,

जी.पी.एस. अनिवार्य

मंत्रालयात एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, “आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की,
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये.

लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की,
तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एस.टी. प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा.

प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही बैठकीत सर्व बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत.

याचबरोबर पुढील काळात एस.टी. बसेस आणि स्थानकांवर ए.आय.चा वापरही करण्यात येणार आहे.”

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

सर्व बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही., जी.पी.एस. अनिवार्य करणार

सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार

सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार

परिवहन विभागात आय.पी.एस. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय

एस.टी. आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल २०२५ पर्यंत हटवण्यात येणार

शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल

बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार

आरोपी अद्यापही फरार

पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोप आरोपी
दत्तात्रेय रामदास गाडे (३५) याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.

त्याला शोधण्यासाठी पुणे पोलीसांनी १३ पथकांची स्थापना केली आहे.

सकाळी घडलेल्या घटनेपासून तो फरार आहे.

याचबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती,
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पी.टी.आय.ला दिली आहे.

Previous articleजनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
Next articleजनता हायस्कूल जालना येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here