आशाताई बच्छाव
यश मनोज नवले आशियाई पाॅवर लिफ्टिंग चाम्पियनशिप २०२५ स्पर्धेत सुवर्णपदक
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) नुकत्याच झालेल्या आशियाई पाॅवरलिफ्टिंग चम्पियनशीप २०२५ स्पर्धेसाठी यश मनोज नवले याची गुजरात येथे निवड झाली होती. त्या स्पर्धेत यश नवले याने घवघवीत यश संपादन करुन गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक पटकाविले. श्रीरामपूर येथील क्रीडा प्रशिक्षक माॅंटी साळवे , श्री. अविनाश राऊत सर तसेच मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली २५० किलो वजन उचलण्याचे मार्गदर्शन त्याला लाभले. प्रसिद्ध नॅशनल बॉडी बिल्डर तसेच मानाचा गणपती वर्ष ७५ , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आझाद मैदान श्रीरामपूर , या मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. यश नवले याने यापूर्वी देखील २०१३ मध्ये झालेल्या श्रीलंका येथे कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून विजेतेपद मिळविले होते. अमरावती येथील बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या विषयात त्याने डिग्री व पदवी मिळवली आहे. या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील , राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते श्री. अविनाशदादा आदिक साहेब, महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसीएनचे अध्यक्ष श्री. सचिन टापरे, श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , मंडळाच्या सांस्कृतिक प्रमुख जयश्रीताई थोरात, अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंग अध्यक्ष श्री. मनोज गायकवाड, प्रख्यात उद्योजक श्री. आशिषदादा बोरावके, माळी शुगर कारखान्याचे संचालक यश बोरावके, किशोर मल्टिप्लेक्स चे मालक कुणाल बोरावके , मंडळाचे इंजि. सुनिल साठे, उद्योजक सुनिल साळुंके, सोमनाथ महाले, सुर्यकांत सगम, प्रविण गुलाटी, समीर आव्हाड, डॉ. विजय त्रिभुवन, प्रा. अनिल बागुल सर , सत्यजीत लबडे , विजय मुगदिया, किशोर फाजगे, प्रमोद पत्की आदिंनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.